शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मोहितेंपासून पवारांपर्यंत.. जोडणारा दुवा निखळला- सातारा कार्यकर्त्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:03 IST

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते ...

ठळक मुद्देपतंगराव कदमांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावरही शोककळा

सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते, तेव्हाच पतंगराव रामराजेंच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले होते. पतंगराव कदम यांच्या जाण्यामुळे यशवंतराव मोहिते यांच्यापासून खासदार शरद पवार यांच्यापर्यंत जोडणारा दुवाच निखळला.

सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत करत पतंगराव मोठे झाले.

त्यांनी राजकारण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत अफाट यश मिळविले. तरी देखील रयत शिक्षण संस्थेशी जोडलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत टिकून राहिली. ९ मे चा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असो अथवा २२ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा या कार्यक्रमांना खासदार शरद पवार यांच्यासह पतंगराव कदम या सोहळ्याला उपस्थित राहत असत.

साहजिकच, कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगायचा. एखादा घरगुती सोहळा असावा, अगदी त्याच पद्धतीने हे दोघेही नेते या सोहळ्यात वावरताना पाहायला मिळायचे. आता पतंगराव कदमांविना हे कार्यक्रम होताना पाहायला लागणार आहे. मागील ९ मेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलायला उठले. त्यांचे भाषण ऐकत असतानाच पतंगराव रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कानात काही हितगुज करत होते.

काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असते. मात्र पतंगराव कदम जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असायचे, तेव्हा हा वाद कुठल्या कुठे लुप्त झालेला असायचा. काँगे्रसमधील अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पतंगरावांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण तयार व्हायचे. कार्यकर्ते कटतट विसरुन जात असत.

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक सुरू होती, तेव्हा मोठे बंधू मोहनराव कदम यांच्या पाठीशी ताकद निर्माण करण्यासाठी कणखर भाऊ सर्वांनी पाहिला. सर्वच पक्षांत असलेले संबंध आणि राजकारणातल्या चाली यशस्वीरीत्या खेळून या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले होते. या निवडणुकीत काहीही करून यश संपादन करण्यासाठी पतंगराव कदम यांची धडपड जिल्ह्याने पाहिली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने समाजकारण आणि राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे. ते शिक्षण व सहकार क्षेत्रांतील अग्रणी नेते होते. त्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात ते ज्येष्ठ मंत्री, कार्यक्षम मंत्री अणि निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची ख्याती होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा डॉ. पतंगरावांचा मला मोठा आधार होता. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. त्यानंतरही माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते पाठीशी राहिले. त्यामुळे माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी लाखो युवक-युवतींना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज पतंगराव कदम यांनी जर शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले नसते तर अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. त्यांनी या माध्यमातून हजारो संसार उभे केले.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री