शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार केवळ धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:49 IST

उंब्रज : ‘मोदी सरकार हे फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. सध्या जनता कोरोनाच्या संकटाने त्रस्त असताना ...

उंब्रज : ‘मोदी सरकार हे फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. सध्या जनता कोरोनाच्या संकटाने त्रस्त असताना त्यांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोदीजी तुम्हीच सांगा देश कसा राहणार,’ असा प्रश्न राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी अजितराव पाटील (चिखलीकर) यांनी उपस्थित केला.

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात कऱ्हाड उत्तर कॉंग्रेसच्या वतीने उंब्रज-मसूर मार्गावरील वडोली भिकेश्वर येथील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, मधुकर जाधव, प्रताप देशमुख, दुर्गेश मोहिते, विकास जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे, सज्जन यादव, अनिल मोहिते, किशोर गांधी, वसंतराव जाधव उपस्थित होते.

हेमंतराव जाधव म्हणाले, ‘केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने शंभरी पार तर डिझेलही शंभरीकडे पोहोचले आहे. ‌ही भाववाढ अशीच सुरू राहिली तर सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे जगणे अवघड होईल.’

सज्जन यादव म्हणाले, ‘इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करीत नाहीत. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले.’

या वेळी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, नंदकुमार जगदाळे, उमेश साळुंखे, कॅ. इंद्रजित जाधव, दुर्गेश मोहिते यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. उमेश साळुंखे यांनी प्रास्तविक केले. यशवंत चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो ०७उंब्रज

कऱ्हाड तालुक्यातील वडोली (भिकेश्वर) येथील पेट्रोल पंपावर सोमवारी कऱ्हाड उत्तर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. (छाया : अजय जाधव)

===Photopath===

070621\img_20210607_111122.jpg

===Caption===

फोटो ओळी -  कराड तालुक्यातील वडोली(भिकेश्वर) येथील पेट्रोल पंपावर कराड उत्तर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ  आंदोलन करताना कॉग्रेसचे पदाधिकारी.