शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पोलीस वसाहती होणार आधुनिक

By admin | Updated: March 12, 2015 00:03 IST

‘लोकमत’चा प्रभाव : महाबळेश्वरमधील कर्मचाऱ्यांमधून समाधान

अजित जाधव - महाबळेश्वर महाबळेश्वर येथील पोलीस वसाहतीचे लवकरच आधुनिकीकरण होणार असून त्यामुळे पोलिसांना आता चांगली घरे आणि सुविधा मिळणार आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा फळास आल्याची प्रतिक्रीया पोलिसांनी यानिमित्ताने व्यक्त केली.येथील पोलीस वसाहतीची अत्यंत दुर्दशा झाली होती. वसाहतीच्या आजूबाजुने झाडेझुडपे वाढली होती. छताची अवस्था आणि तेथील सुखसोयी बद्दल लोकमतने वारंवार प्रकाश टाकून पोलिसांची बिकट समस्या समोर आणली होती.त्यानंतर बांधकाम विभागाने पोलिसांच्या मदतीने या पोलीस वसाहती अत्याधुनिक व सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनाही आता अच्छे दिन येणार आहेत. महाबळेश्वर येथे ब्रिटिश काळापासूनची लाल,जांभ्या दगडात बांधकाम केलेल्या पोलीस वसाहतीच्या तीन चाळी आहेत. त्यात ४२ खोल्या असून, सुमारे ४२ पोलीस कुटुंबांची राहण्याची सोय होती.मात्र गेले कित्येक वर्षे या वसाहतीतील खोल्यांकडे ना पोलीस खात्याने ना सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे म्हणावेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे गेले अनेक वर्षे या वसाहतीची अत्यंत दुर्दशा झालेल्या अवस्थेत आहेत. चाळीतील सर्वच खोल्यांनी अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेले असून, जेथे पूर्वी पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबीयासह आनंदाने राहायचे व आपले कर्तव्य पार पाडायचे त्याच वसाहतीमधून आता सरपटणारे भयावह प्राणी, मोठ-मोठ्या घुशी, उंदरे राहत आहेत. या वसाहतीची ही गंभीर व भयावह अवस्था गेले अनेक वर्षांपासून झाले असून, यामुळे येथे कामास आलेल्या व विविध हंगामात बंदोबस्ताला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. पोलिसांना स्वत:ची हक्काची जागाच नसल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते.वसाहतीसाठी दीड कोटीचा निधी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पोलीस खात्याचे वरिष्ठ व सार्वजनिक खात्याच्या वरिष्ठांनी तातडीने या वसाहतीची पाहणी करून प्रस्ताव व इस्टिमेट करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. राज्य शासनाने तो त्वरित मंजूर करून त्यासाठी लागणारा सुमारे दीड कोटींचा निधीसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला. या घटनेस सुमारे तीन वर्षे झाले तरी सार्वजनिक बांधकाम खाते गप्पच होते. याबाबत लोकमतने आवाज उठवून निद्रिस्त व सुस्त खात्याची झोप उडविली होती. यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन सध्या या पोलीस वसाहतीच्या बांधकामासाठी अखेर हालचाली सुरू केल्या.