शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्र

By admin | Updated: November 16, 2016 23:12 IST

मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर

सातारा : सांगली-सातारा विधानपरिषदेचे कॉग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असून प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यावेळी मोहनराव कदम यांना जिल्ह्यातून मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. डॉ. पतगंराव कदम आणि मोहनराव कदम यांनी नेहमीच पक्षाची कवाडे बाजूला ठेवून शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना सहकाऱ्याची भुमिका घेतल्याने त्याचा फायदा मिळेल, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, सांगलीतील विशाल पाटील गटानेही कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे. मोहनरावांसाठी सातारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदाराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, अ‍ॅड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भिमरावकाका पाटील, हिंंदुराव पाटील, प्रल्हाद साळुंखे-पाटील, धैर्यशिल कदम, डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते शंकराव गाढवे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, गुरूदेव बरदाडे, अविनाश नलवडे, विजय भिलारे, सतीष भोसले, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम यांच्यासह नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. (प्रतिनिधी)