शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरुद्ध मनसेचे आंदोलन!

By admin | Updated: October 19, 2015 23:48 IST

गोदामे फोडू...

सातारा : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. अनेकदा वेळ बदलल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आधी सकाळी अकराला जाहीर झालेले आंदोलन लांबत-लांबत दीड वाजता झाले. गाडीतून आणलेले ढोलताशे वाजविण्यात आले. तसेच पक्षाचा स्कार्फ गळ्यात घालून महागाईविरोधात घोषणा देण्यात आल्या. पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प अहे. डाळी, पेट्रोल, डिझेल, कांदा, भाजीपाला व इतर खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत.यासंदर्भात सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही. त्यामुळे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे.महाराष्ट्रात फोफावलेला प्रचंड साठेबाजार सरकारच्या आशीर्वादानेच चालू असून, काही परप्रांतीय व्यापारी अन्नधान्ये, डाळी यांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई करीत असल्याचा आरोपही संबंधितांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)गोदामे फोडू...महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रशासनाने गप्प न बसता साठेबाजांच्या गोदामांवर छापे मारून धान्यसाठा जप्त केला पाहिजे. त्याचे वाटप जनतेला केले पाहिजे. साठेबाजांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. अन्यथा मनसे जनतेच्या हितासाठी ही गोदामे फोडेल. प्रसंगी मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही. अशा वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पक्षाने दिला आहे.