शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फलटण पोलिसांच्या विरोधात ‘मनसे’ची तक्रार

By admin | Updated: August 2, 2014 00:00 IST

पोलीस अधीक्षकांना निवेदन : अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

सातारा : फलटण तालुक्यातील पोलीस यंत्रणाच गुन्हेगारांना साथ देत आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तालुक्यात बेकायदेशीर आणि अवैध धंदे, व्यवसाय वाढत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील गुन्हेगारीत वाढ होत आहे. फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या कार्यकालात फलटणमध्ये गुन्हेगारी वाढली. पोलीस दलातील काही सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली. फलटण येथील अरिहंत अ‍ॅटोमोबाईल्समधून नवीन मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या. त्या हस्तगत केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. मात्र, आजही हा कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. फलटण येथील एका मिलमधून इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या. त्या पकडल्यानंतर त्याची कोणतीही नोंद न करता आरोपींना सोडून देण्यात आले. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे फलटण येथील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अनेकदा पोलीस दप्तरी गुन्ह्यांची नोंद संख्या कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, यावर कोणतीही ठोस उपाययोजना नाही आखली तर कोणत्याही क्षणी फलटण शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी मिथिलेश दोशी, शिवाजी भोई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)