शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात बचावलेले आमदार जयकुमार गोरेंवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार 

By दीपक शिंदे | Updated: December 24, 2022 08:51 IST

फलटणजवळील बाणगंगा नदीत आमदार जयकुमार गोरे यांची गाडी कोसळली, गोरेंसह चौघे जखमी

फलटण : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि माण खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे भीषण अपघात झाला असून अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या सोबत असलेले इतर तिघेही जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे नागपूर अधिवेशनाहून पुणे येथे आले होते. तेथून फलटण मार्गे शनिवारी पहाटे तीन वाजता त्यांच्या गावी जात असताना फलटण शहरांमध्ये असणाऱ्या स्मशानभूमी जवळील बाणगंगा नदीच्या पुलावर चालकाला  वळणाचा अंदाज न आल्याने गाडी पलटी होऊन नदीत पडली. 

यामध्ये आमदार जयकुमार गोरेंसह त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक आणि चालक असे चौघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत मोबाईल वरुन माहिती देताच पोलिस आणि कार्यकर्ते अपघातस्थळी आले. आमदार गोरे यांना पुणे येथे तर इतरांना बारामती येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नदीत पडलेली गाडी क्रेनच्या साह्याने वर काढण्यात आली आहे. गाडीचा पूर्णपणे चूराडा झाला आहे.

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरे