शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीवर डोके आपटून मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:05 IST

सातारा : दारू वाटपाच्या वादातून राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय ४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) याचा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला. ही घटना सातारा नगरपालिका आवारात घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासांत सराईत गुंड युवराज ऊर्फ बाबू रामचंद्र भोसले (३४, केसरकर ...

सातारा : दारू वाटपाच्या वादातून राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय ४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) याचा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला. ही घटना सातारा नगरपालिका आवारात घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासांत सराईत गुंड युवराज ऊर्फ बाबू रामचंद्र भोसले (३४, केसरकर पेठ, सातारा) याला अटक केलीे.याबाबत माहिती अशी की, मृत राजेंद्र सूर्यवंशी (४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) हे रोज रात्री सातारा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंग तळमजल्याच्या मोकळ्या जागेत झोपत असे. शनिवारी रात्री राजेंद्र आणि युवराज भोसले त्या ठिकाणी आले. दोघेही दारू पित बसले होते. दरम्यान, दारूचे वाटप कमी जास्त असल्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी युवराजने रागाच्या भरात राजेंद्रचे डोके भिंतीला आपटले. यात राजेंद्रच्या डोक्यातून रक्तस्रावहोऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर युवराजने त्या ठिकाणावरून पळ काढला. नगरपालिकेचे काही कर्मचारी रविवारी सकाळी आले असता त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि कर्मचाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण केल्यानंतर पंचनामा केला. मृत राजेंद्रचा भाऊ शेखर बबन सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या चार तासांत उलगडाशहराच्या मध्यभागी ही घटना घडल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पंचनामा करीत असताना मृत राजेंद्र याच्यासोबत एकजण दारू पित बसला होता, अशी माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड यांच्या पथकाने आरोपी युवराज भोसले याला देवदर्शनाला जात असताना पोलीस करमणूक केंद्र परिसरातून ताब्यात घेतले.युवराजचा भाऊही आहे गजाआडखुनाच्या आरोपीखाली अटक केलेला युवराज भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पत्नीस जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच काही दिवसांपूर्वी केसरकर पेठेतील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात त्याचा भाऊ भरत भोसले अटकेत आहे. या खून प्रकरणाची माहिती मृत राजेंद्र सूर्यवंशी याने पोलिसांना दिली असल्याचा संशय युवराजला होता. त्याचाही राग मनात असताना दारू वाटण्यावरून दोघांत वाद झाला. या वादात त्याने राजेंद्रचा भिंतीवर डोके आपटून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासांत या खूनाचा उलगडा झाला.