शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यामध्ये गणपती विसर्जनावेळी अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 16:21 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या एका सहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामदास चंद्रकांत फाळके याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या मुलीचा विनयभंग कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलमुलीने घरात येऊन आई व वडिलांना सांगितला प्रकार

सातारा  : गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या एका सहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामदास चंद्रकांत फाळके याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरु झाली. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अल्पवयीन मुलगी व तिच्या समवयस्क दोन मैत्रिणींसमवेत गेल्या होत्या. तिघी मुली गणेश मूर्ती असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या होत्या. त्याचवेळी रामदास फाळके याने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन या मुलीबरोबर केले, तिने विरोध केला व बसण्याची जागा बदलली, मात्र पुन्हा फाळके हा तिच्याशेजारी जाऊन बसला. 

मिरवणुकीनंतर संबंधित मुलीने घरात येऊन आई व वडिलांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फाळके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत.