शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकाची मंत्रालयातून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:34 IST

सातारा : सातारा जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला दराअभावी कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला. यासंदर्भाचे कांदा उत्पादक शेतकºयाच्या होणाºया ...

सातारा : सातारा जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला दराअभावी कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला. यासंदर्भाचे कांदा उत्पादक शेतकºयाच्या होणाºया ससेहोलपटीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची मंत्रालयाने दखल घेतली असून, बुधवारी सकाळी कांद्याच्या भावासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे.राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पडलेल्या दरामुळे कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने करायचे काय? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकºयांना पडला आहे. फलटण तालुक्यातील वाघोशी येथील रामचंद्र जाधव या कांदा उत्पादक शेतकºयाने ४५० किलो कांदा केवळ एक रुपये किलोने विकला. मात्र, त्याच्या हाती काही न येता उलट व्यापाºयालाच खिशातून पैसे देण्याची वेळ कशी आली, याची व्यथा ‘लोकमत’ने प्रशासन आणि समाजासमोर आणली.सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या भीषण परिस्थितीचे वृत्त ‘लोकमत’ने मांडल्यानंतर ही बातमी मंत्रालयात पोहोचली. ‘लोकमत’च्या बातमीची कात्रणे अधिकाºयांनी काढून कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दाखवली. त्यानंतर मात्र कांदा उत्पादकांच्या न्यायाला वाचा फुटू लागल्याची आशा पल्लवित झाली आहे. या बैठकीत होणारी चर्चा व निर्णयावर राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकºयांसह व्यापाºयांचे लक्ष लागून राहिले आहे.मंत्री खोत यांनी तातडीने बुधवारी मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला मंत्रालयातील कृषी, सहकार आणि पणन विभागाच्या दहा महत्त्वाच्या अधिकाºयांना बोलवण्यात आले आहे. या बैठकीमध्ये ‘कांद्याचे भाव, कांदा निर्यात सद्य:स्थिती’ यावर चर्चा होऊन महत्त्वाचे घेतले जाणार आहेत. या बैठकीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव घड्याळे यांनी काढले आहेत.शेतकºयाला मदत मिळणार काय?कांद्याला दर न मिळाल्याने कांदा उत्पादनक शेतकºयांवर कवडीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ आली आहे. कांदा उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च निघणे मुश्कील झाले आहे. एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे कोसळलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकºयावर संकटांचे आभाळ कोसळले. त्यामुळे पुढील काळात त्यांच्या पुढे जगण्याचा प्रश्न आवासून पुढे उभा आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे.बैठकीला यांची उपस्थिती..कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी विभागाचे सहसचिव, कृषी आयुक्तालयाचे संचालक, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, नाफेडचे शाखा व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.