शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद दिलं त्यांचीच पक्षाशी गद्दारी !

By admin | Updated: September 3, 2016 01:05 IST

पृथ्वीराज चव्हाण : मलकापुरात कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा मेळावा

मलकापूर : कऱ्हाड दक्षिणमध्ये गेली ३५ वर्षे पक्षाने सत्ता व मंत्रिपद दिले. मात्र त्यांनीच वेळोवेळी पक्षाशी गद्दारी केली. तर दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या घरातील व्यक्तींनी विचारवंतांच्या विचाराशी गद्दारी करीत जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेने विधानसभा निवडणुकीत केले. कोणताही भेदभाव न करता मी देता येईल तेवढे दिले. भविष्यातही देणार. माझी दारे जनतेसाठी सदैव खुली आहेत. आगामी निवडणुका एक ताकदीने लढवूया,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कऱ्हाड दक्षिण काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक अभय छाजेड, तौफिक मुलाणी, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, विजयराव कणसे, अधिकराव पाटील, राजेंद्र चव्हाण, जयवंत जगताप, मलकापूरच्या नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, उदय थोरात, आर. टी. स्वामी आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, ‘मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यभर कारभार सांभाळताना कऱ्हाडकडे थोडे दुर्लक्ष झाले, हे मला मान्य आहे. मात्र, माझ्या गैरहजेरीतही तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. जनाधाराची घमेंड उतरली. कऱ्हाड दक्षिणमधे जे ३५ वर्षांत जमले नाही, ते केवळ चार वर्षांत करून दाखवले. कोट्यवधीची कामे सुरू आहेत. कोणताही भेदभाव न करता गरज असेल तिथे काम दिले ही सर्व कामे पूर्ण होणारच.’ निरीक्षक अभय छाजेड म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या कामाचा तळागाळापर्यंत प्रसार करा. भाजप सरकारच्या अपयशामुळे राज्यात सध्या विनयभंगात देशात १ नंबर तर अत्याचारात २ नंबर बनले आहे. सध्याचे राज्य व केंद्र सरकार फसवे आहे. अशा फसव्यांचा पाडाव करण्यासाठी संघटित व्हा.’मनोहर शिंदे यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)युवकांना प्रवाहात घेणारमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. विकेंद्रीकरणासाठी अनेक नगरपंचायती निर्माण केल्या. १ हजार ७०० कोटींचा निधी कऱ्हाड तालुक्यासाठी दिला. सर्व कामेही मार्गी लावली. त्यांनी केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. हे करीत असतानाच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे, अशी माहिती आमदार आनंदराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.