शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

अधिकाऱ्यांना मिनरल; लोकांना दूषित पाणी

By admin | Updated: March 11, 2016 23:58 IST

पाटण तालुका : शंभर गावे टंचाई घोषित, पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखा; सदस्यांचे आवाहन--पंचायत समिती मासिक सभा

पाटण : तालुक्यातील शंभर गावे पाणीटंचाई म्हणून घोषित झाली असताना आणि त्यापैकी सहा गावांना टँकरने पाणी पुरवायची वेळ आली असताना अधिकारी नियमांवरच बोट ठेवून उपाययोजना करण्यास विलंब करत असतील आणि दुसरीकडे घोट (फडतरवाडी) येथील लोक पाणीटंचाईमुळे विहिरीतील जलयुक्त दूषित पाणी पित असतील तर मिनरलचे पाणी पिणाऱ्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत सर्वच सदस्यांनी पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखा, असा इशारा दिला.सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची सभा पार पडली. प्रारंभी सदस्य नथुराम कुंभार यांनी तालुक्यात पाणीटंचाईची भयानक स्थिती असल्याचे सांगितले. त्यावर राजाभाऊ शेलार यांनी पावसाळा येईल, महिन्यापासून एकही टँकर तालुक्यात पाण्यासाठी आलेला नाही. अधिकारी यापुढे डोळ्यांत तेल घालून काम करतील? असा सवाल केला. तर सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी आक्रमक होत घोट (फडतरवाडी) गावास भीषण पाणीटंचाई भासत असून, विहिरीतील दूषित पाणी लोक पितात. हेच पाणी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना पाजले पाहिजे, असे त्यांनीसांगितले. (प्रतिनिधी)वीजवितरण अधिकाऱ्यावर ताशेरेसहायक अभियंता जे. व्ही. पाटील गेल्या बैठकीत म्हणाले होते की, ‘मी काय जेवण, अंघोळ करत असताना मोबाईल कॉल उचलायचा का?’ यावर शोभा कदम यांनी पाटील यांना धारेवर धरत काखट गावात डीपी जळून वीजपुरवठा बंद झाला आहे. वीज कर्मचाऱ्यांना फोन केला तरी गावात गेले नाहीत. मग तुम्हाला नेमका कधी फोन करायचे ते सांगा?,’ असा सवाल उपस्थित केला.‘कोयना धरणाच्या पाणी साठ्याच्या आत वाजेगावची घरे आहेत. तेथे प्राथमिक शाळा आहे. त्यांना कोयनानगर येथे ये-जा करण्यासाठी लाँच सुरू करा; अन्यथा आंदोलन करू,’ अशी मागणी राजाभाऊ शेलार यांनी केली.अधिकाऱ्यांना उचलून आणू..सभेच्या प्रारंभीच अधिकारी बैठकीस गैरहजर असल्याचे सदस्यांना निदर्शनास आले. यामध्ये कृषी, आरोग्य, एसटी, वनविभाग सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. याबाबत उपसभापती डी. आर. पाटील म्हणाले, ‘पुढच्या बैठकीस अधिकारी नसतील तर खपवून घेणार नाही.’ रामभाऊ लाहोटी म्हणाले,‘अधिकाऱ्यांना गाड्या पाठवून सभेस आणले जाईल.’ शेलार म्हणाले, सभेला गैरहजर राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना उचलून आणावे लागेल.