शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दूध, कांदे ओतून शासनाच्या नावानं शिमगा!

By admin | Updated: June 4, 2017 22:36 IST

दूध, कांदे ओतून शासनाच्या नावानं शिमगा!

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेती व्यवसायातील अडचणी सरकारच्या समोर मांडण्यासाठी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे तरुण शेतकऱ्यांनी दूध आणि कांदे रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करीत बोंबाबोंब आंदोलन केले. खंडाळा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, खंडाळ्याचा आठवडी बाजाराकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.रविवारी पारगाव येथे सकाळी ११.३० वाजता तरूण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुधाचे कॅन तसेच कांद्याच्या पिशव्या रस्त्यावर ओतल्या. यावेळी भाजपा सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दडपण्याचे काम सरकार करत असल्याची चर्चा सुरु होती.घरोघरी दुधाचे वाटपभादे याठिकाणीही शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपल्या भावना व्यक्त केल्या. शेकडो लोकांनी एकत्र येवून निषेध नोंदवला. बहुतांशी गावातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल व्यापाऱ्यांपर्यंत पोहचवलाच नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना चारदिवस हातावर हात ठेवून बसावे लागले. जवळे या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध डेअरीवर न घालता इतर शेतकऱ्यांच्या घरी नेऊन वाटून अनोख्या पद्धतीने संपाला प्रतिसाद दिला.शहरात दिवसभर शुकशुकाटखंडाळ्याचा दर रविवारी आठवडा बाजार भरतो. मात्र, शेतकरी संपाच्या पार्शभूमीवर आजच्या बाजाराकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याने व्यापारीही आले नाहीत. त्यामुळे बाजार दिवसभर बंद राहिला तर काही दुकानदारांनीही या संपाला पाठिंबा दर्शवत बंद पाळला . त्यामुळे खंडाळा शहरात दिवसभर शुकशुकाट होता.शेतकऱ्यांचा दिवस शिवारातचअंदोरी येथील एकाही शेतकऱ्याने शेतीमधून भाजीपाला काढला नाही. अंदोरी येथून मुंबई येथील बाजारात दररोज भेंडीची किमान १०० कॅरेट जातात. मात्र आजपर्यंत एकही कॅरेट भरले गेले नाही. अंदोरी आणि पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र शेतकरी संपामुळे शेतकऱ्यांनी दिवसभर शेतातील इतर कामात वेळ घालवला.