शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस देण्याच्या यादीत म्हसवडचा नामोल्लेखही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:24 IST

म्हसवड : सातारा जिल्ह्यामध्ये १८ ते ४४ या वयातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे राबवला जात आहे. ती ...

म्हसवड : सातारा जिल्ह्यामध्ये १८ ते ४४ या वयातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे राबवला जात आहे. ती लस जिल्ह्यात कोठे कोठे द्यावी, याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले आहे. मात्र, या आदेशामध्ये माण तालुक्यातील सर्वांत मोठे शहर असलेल्या म्हसवडचा नामोल्लेखही नाही. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे म्हसवड सातारा जिल्ह्यात आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वांत जुनी व सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेली नगर परिषद म्हणून म्हसवडची वेगळी ओळख आहे. या शहराची लोकसंख्याही सुमारे ३२ हजारांहून अधिक आहे, तसेच या शहराच्या चारी बाजूंना बारा वाड्या आणि बारा खेडी आहेत, तर माण तालुक्यात आजवर सर्वाधिक कोरोना रुग्णही याच शहर परिसरात सापडले आहेत. त्यामुळेच या शहरात सध्या दोन कोरोना सेंटर आहेत. या सेंटरमध्ये म्हसवडसह परिसरातील लहान- मोठ्या गावांतील शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. हजारो जण कोरोनामुक्तही झाले आहेत.

कोरोनाला हरवायचे असेल, तर शासन नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. तितकेच गरजेचे नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठीच शासनाने लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र, त्या लसीचे नियोजन करण्यात प्रशासन कमी पडत आहे. म्हसवडसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पन्नास ते साठ लस उपलब्ध होत असल्याने येथे लसीकरणाचा वेग मंदावला आहे, अशी परिस्थिती असताना आता शासनाने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा अध्यादेशही मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी काढला आहे. त्यांच्या आदेशानुसार माण तालुक्यात दहिवडी येथेच या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे.

तालुक्याचा विचार केल्यास दहिवडी येथे एकाच ठिकाणी लसीकरण होणार असल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येणारच आहे. तालुक्यातील १८ ते ४३ वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. दहिवडीबरोबरच म्हसवड येथेही सुविधा सुरू झाल्यास लसीकरणाचा वेग निश्चित वाढणार आहे. याशिवाय नागरिकांचा वेळ व पैसाही वाचणार आहे. शासनाची लस मोफत असली तरी ती घेण्यासाठी दहिवडीपर्यंतचा प्रवास या प्रत्येकालाच करावा लागणार आहे. दहिवडीपासून काही गावे जवळपास साठ किलोमीटर अंतरावर आहेत. या ठिकाणाहून लसीकरणासाठी जाणे प्रत्येकालाच शक्य होणार नाही. गेल्यास एका हेलपाट्यातच लस मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे नागरिकांतून लसीकरणाला प्रतिसाद कितपत मिळेल, हे सांगता येत नाही. म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्रे आहेत. लसीकरण सुरू झाल्यास म्हसवड शहरासह वरील उपकेंद्रांतील व पुळकोटी, पळशी या आरोग्य केंद्रांतील व्यक्तींना याचा लाभ लवकर मिळू शकतो.

चौकट

सर्वच आरोग्य केंद्रामध्ये लससाठी प्रयत्नशील : देसाई

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी मोठी आहे. जिल्ह्यातील बाधिताचे प्रमाण कमी करण्यासाठी तालुक्यात एक केंद्र देऊन उपयोग होणार नाही. वेळेत लसीकरणही होणार नाही. त्यामुळे शासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई यांनी दिली.

कोट

माण तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी म्हसवड येथे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

-नितीन दोशी,

माजी नगराध्यक्ष म्हसवड पालिका