शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवडमध्ये दारूबंदी !

By admin | Updated: June 21, 2017 00:39 IST

पालिका सभेत ठराव : निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसवड : म्हसवड नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने मंगळवारी (दि. २०) झालेल्या विशेष सभेत नगरपरिषद हद्दीतील दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अशा प्रकारचा निर्णय घेणारी म्हसवड राज्यातील पहिलीच नगरपालिका ठरली आहे. म्हसवड पालिकेची सभा नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पालिका सभागृहात पार पडली. या सभेत सात विषय ठेवण्यात आले होते. यापैकी पालिका हद्दीतील दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्याच्या ठरावावर सत्ताधारी व विरोधकांनी मते मांडली व हा विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखालील म्हसवड नगरपालिकेत सत्तांतर होऊन सत्ता परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात आली. नुकतीच शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष तुषार विरकर व सत्ताधारी नगरसेवकांची बैठक घेऊन शहरात दारूबंदी व अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी पालिकेने ठराव करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी झालेल्या विशेष सभेत हा महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात आला. या विषयाला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकमुखी पाठिंबा देत टाळ्या वाजवून स्वागत केले. हा निर्णय घेताना विशेषत: महिला नगरसेवकांनी आग्रही भूमिका घेतल्याचे सभागृहात दिसून आले. सभागृहापुढे सात विषय मांडण्यात आले होते. यापैकी पाच विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले, तर दोन विषय पुढील सभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती शहाजी लोखंडे, नियोजन सभापती गणेश रसाळ, विरोधी गटनेते अखिल काझी, डॉ. वसंत मासाळ, विकास गोंजारी, हिंदमालादेवी राजेमाने, सविता म्हेत्रे, सविता माने, कलाबाई पुकळे, गटनेते धनाजी माने, दीपक विरकर, केशव कारंडे, संग्राम शेटे, तेजस्विनी सोनवणे, शोभा लोखंडे, मनीषा विरकर, रणजित येवगे उपस्थित होते. ---- शेखर गोरे यांनी पालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा संकल्प बैठकीत व्यक्त केला होता. तो निर्णय मंगळवारी सभागृहासमोर ठेवण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाला सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी पाठिंबा देऊन बाटली हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. - तुषार विरकर, नगराध्यक्ष