शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दलदलीच्या विळख्यात म्हाडा कॉलनी

By admin | Updated: February 27, 2015 23:25 IST

सहा महिन्यांपासून गटारे तुंबली : उपाययोजनेची नागरिकांची मागणी

सातारा : देशात ‘स्वाइन फ्लू’सारख्या रोगाने तोंडवर काढले आहे. यासाठी शासनामार्फत स्वच्छतेचे संदेश देण्यात येत आहे. यासाठी पालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी अंग झटकून कामला लागले आहेत. परंतु साताऱ्यातील सदर बझार येथील म्हाडा कॉलनी मागील सहा महिन्यांपासून दलदलीत सापडली असून देखील ही बाब पालिकेच्या निदर्शनात आलेली नाही.सदर बझार येथून महामार्गाकडे जाणाऱ्या या मार्गावरच एकीकडे म्हाडा कॉलनी, लक्ष्मी टेकडी वसाहत वसली आहे. जवळपास सदर बझार येथील अनेक वस्त्यांचे या ठिकाणी सांडपाणी सोडण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांतून अधिक काळ येथील गटारे तुंबली आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात दलदलीत झाली आहे.मुळातच या ठिकाणी डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे या सांडपाण्यात डबकीत बसून रोगराई पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. याविषयी वारंवार पालिका नगरसेवक व स्वच्छता विभागाला कळवून देखील दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे भविष्यात येथे रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. म्हाडा कॉलनीच्या पूर्व भागात वस्ती वाढली असून, याच मार्गाचा वापर येथील नागरिकांना करावा लागत आहे. तर सदर बझार येथील नागरिकांनाही महामार्गावर जाण्यासाठी हा मार्ग वापरावा लागत आहे. येथून जाताना डबक्यातून जावे लागत आहे. येथे डास, माश्या, आळ्या डबक्यात दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात रोगराईत वाढ झाली आहे. म्हाडा कॉलनी, लक्ष्मी टेकडी वसाहत व येथील जवळपास २०० ते ३०० कुटुंबीयांना या दलदलीचा त्रास सहन करावा लागत आहे. या दलदलीमुळे रोगराई पसरण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील चिमुकले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी म्हणून यावर लवकरच पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)पालिकेचे दुर्लक्षदरम्यान, सदर बझार येथील पूर्वेकडील भागात नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी पालिका दुर्लक्ष करत आहे. येथील पुढील भाग हा खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो, त्यामुळे येथील स्वच्छता होत नाही, असा काही नागरिक आरोप करीत आहे.