शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बाल वारकऱ्यांनी दिला वृक्ष संगोपनाचा संदेश

By admin | Updated: June 30, 2017 13:09 IST

सोनगाव येथे वृक्षारोपण उत्साहात : कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून उपक्रम

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. ३0 : ढोल-ताशे, टाळ-मृदंग आणि हरि नामाच्या गजराने सोनगाव भक्ती रसात न्हाऊन तर निघालेच पण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या बाल वारकऱ्यांनी गावातून दिंडी काढून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन, संगोपन करा, असा सामाजिक संदेश देवून जनजागृती केली. निमित्त होते कर्तव्य सोशल ग्रुपच्या वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन उपक्रमाचे. या उपक्रमांतर्गत सोनगाव, ता. सातारा येथे रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० झाडे लावण्यात आली. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. वृक्षारोपणानंतर प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली. प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव त्या झाडाच्या बुंध्याला पाटीद्वारे लावण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही झाडे लावून देऊ, तुम्ही संगोपन करा, असा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोनगाव येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जेसीबीच्या साह्याने खड्डे काढून देण्यात आले. यानंतर पर्यावरणपूरक रोपही मोफत देण्यात आले. या रोपांची लागवड वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालचमूंच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली. या दिंडीत वारकऱ्यांचा वेष परिधान करुन, हाती दिंड्या पताका घेवून असंख्य बाल वारकरी सहभागी झाले होते. या दिंडीत वेदांतिकाराजेही सहभागी झाल्या होत्या. ही दिंडी वृक्षारोपणस्थळी आल्यानंतर वेदांतिकाराजे भोसले यांनी निसर्ग रक्षण, पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपनाचे महत्व पटवून दिले. जागतिक तापमान वाढ, पर्जन्यमानात घट, गारपीट, अतिवृष्टी, भीषण दुष्काळ आदी गंभीर संकटे निसगार्चा समतोल बिघडल्यानेच ओढावत आहेत. निसगार्चे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ वृक्षारोपण करुण चालणार नाही तर, वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संवर्धन, संगोपन करणे आवश्यक आहे, असे सांगून लावलेल्या झाडांचे संगोपन करा, असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले. यावेळी स्कूलचे मुख्याध्यापक एन. बी. भांबुरे, पी. जे. सोनावणे, व्ही. एस. ढवळे, के. एन. देशमुख, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला रसाळ, सुजाता क्षिरसागर, जयमाला चव्हाण, वृषाली खांडेकर, मारुती पाटील यांच्यासह विश्वास नावडकर, शशिकांत जाधव, रघुनाथ जाधव, धोंडिराम जाधव, रघुनाथ कदम, संतोष राऊत, रमेश पवार, ग्रामसेवक डोंगरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनव उपक्रमात सहभागाचे आवाहन...

निसर्ग रक्षणासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने आम्ही झाडे लावून देणार, तुम्ही संगोपणाची जबाबदारी पार पाडा, या अनोखा उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे. ज्यांना रोपे पाहिजेत त्यांना मोफत रोपे देऊन ग्रुपतर्फेच वृक्षारोपणही करुन दिले जात आहे. या अभिनव उपक्रमात सहभागी होवून निसर्ग रक्षणाची सामाजिक जबाबदारी पार पाडावी. वृक्षारोपणानंतर जे लोक झाडांची काळजी घेतील. संगोपण करुन वृक्षवाढीसाठी सकारात्मक प्रयत्न करतील अशा लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी केले आहे.