कुडाळ : पवारवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. प्रगतशील शेतकरी दिवंगत रामचंद्र वारागडे यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी ही परंपरा जपली आहे.
पवारवाडी शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान दरवर्षी स्कूल कमिटी सदस्य व रामचंद्र वारागडे करीत होते. त्यांच्या निधनानंतर हीच परंपरा त्यांच्या कुटुंबाने कायम सुरू ठेवली आहे. सरपंच तुकाराम भिलारे, नरहरी वारागडे, संभाजी वारागडे, पोलीस पाटील राकेश वारागडे यांच्या हस्ते साक्षी धुमाळ, समीक्षा गायकवाड, आयुष पवार यांच्यासह मुख्याध्यापक बी. व्ही. बर्गे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच सुभद्रा पवार उपस्थित होत्या. रवींद्र सावंत यांनी आभार मानले.