शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा तापला! वर्षात प्रथमच पारा ३८ अंशांजवळ; बाजारपेठेत तुरळक वर्दळ 

By नितीन काळेल | Updated: April 4, 2023 18:45 IST

सातारा शहराचा पारा वाढत असून मंगळवारी ३७.५ अंशांची नोंद झाली.

सातारा: सातारा शहराचा पारा वाढत असून मंगळवारी ३७.५ अंशांची नोंद झाली. त्यामुळे शहराचे या वर्षातील आतापर्यंतचे हे उच्चांकी तापमान ठरले. तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या सुमारास साताऱ्यातील बाजारपेठेत तुरळक वर्दळ जाणवली तसेच प्रमुख रस्त्यावरील वाहतूकही मंदावली होती. सातारा शहरात दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत थंडी जाणवते; पण, यावर्षी कडाक्याची थंडी अनुभवयास मिळालीच नाही. त्यातच फेब्रुवारीच्या मध्यावरच थंडी संपली होती. त्यानंतर पारा वाढत गेला. 

२१ आणि २३ फेब्रुवारीला सातारा शहराचे कमाल तापमान ३६.३ अंश नोंद झाले होते. हे २०२३ या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. त्यावेळीही दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी तापमान घसरले. मार्च महिन्याच्या मध्यावर तर अवकाळी पाऊस झाला. परिणामी शहराचा पारा २९ अंशांपर्यंत खाली आला होता. यामुळे सातारकरांची काही दिवस ऊन आणि उकाड्यापासून सुटका झाली. पण, गेल्या तीन दिवसांपासून पारा वाढू लागला आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत नसली तरी दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हामुळे रस्त्यावरुन चालणेही धोकादायक बनले आहे. मंगळवारी तर सातारा शहराचा पारा ३७.५ अंश नोंद झाला. उन्हाची तीव्रता असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर तसेच बाजारपेठेत तुरळकच लोक दिसत होते. तसेच वाहतुकीवरही परिणाम झालेला. नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवरही कुठेही गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे सातारकरांना एप्रिलच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे.

दरम्यान, सोमवारच्या तुलनेत सातारा शहराचा पारा दीड अंशाने वाढला आहे. यामुळे उन्हाच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात उन्हामुळे शेतकरी आणि मजूर हैराण झाले आहेत. सातारा शहरातील कमाल तापमान...दि. २५ मार्च ३४.०७, २६ मार्च ३५.०२, २७ मार्च ३५.०७, २८ मार्च ३५.०८, २९ मार्च ३५.०८, ३० मार्च ३४.०५, ३१ मार्च ३४.०७, दि. १ एप्रिल ३४.०७, २ एप्रिल ३४.०८, ३ एप्रिल ३५.०७, दि. ४ एप्रिल ३७.०५. महाबळेश्वरचा पारा वाढलाथंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा २९ अंशांच्या दरम्यान सतत होता. मात्र, मंगळवारी कमाल तापमान ३१.०१ नोंद झाले. यामुळे महाबळेश्वरही तापू लागले आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात महाबळेश्वरचा पारा ३२ अंशापर्यंत पोहोचला होता.

 

टॅग्स :satara-pcसातारा