शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा बाजार नसल्याने व्यापारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:18 IST

coronavirus, market, sataranews कोरोना महामारीमुळे प्रत्येक व्यवसायाची कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनासह व्यापाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. खटाव-माण तालुक्यातील आठवडे बाजारांना बंदी असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असून त्यांनी रस्त्याकडेलाच विक्री सुरू केली आहे.

ठळक मुद्देआठवडा बाजार नसल्याने व्यापारी रस्त्यावरबाजार सुरू करण्याची मागणी : मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांचा व्यवसाय अडचणीत

वडूज : कोरोना महामारीमुळे प्रत्येक व्यवसायाची कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनासह व्यापाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. खटाव-माण तालुक्यातील आठवडे बाजारांना बंदी असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असून त्यांनी रस्त्याकडेलाच विक्री सुरू केली आहे.शहरातील तसेच तालुक्यातील मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांचे जीवनमान आठवडे बाजारांवर अवलंबून आहे. प्रपंचाचा रहाटगाडा व उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या मालावरच भले मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये प्रामुख्याने छोटी मिठाई दुकाने, कापड व्यावसायिक, कपबशी, खेळणी, चप्पल, चटणी मसाला, चुरमुरे-फुटाणे तसेच फळ विक्रेत्यांची आठवडा बाजार नसल्यामुळे उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत करावी लागत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मंडईकडे फिरकेनासे झाले आहेत. तर तालुक्यातील वडूज, पुसेगाव, पुसेसावळी, मायणी, खटाव, औंध, कातरखटाव, कलेढोण, चितळी व चौकीचा आंबा मुख्य शहरांचे आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील ग्राहकांचीही मोठी कुचंबना होत आहे.

यामुळे ग्राहकांबरोबरीने मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी आठवडा बाजार करणारे मध्यमवर्गीय व्यापारी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. प्रचंड दडपणाखाली आहेत. व्यवसायातील अस्थिरतेमुळे ताणतणावाखाली असलेले हे व्यापारी दिशाहीन झालेले दिसून येत आहेत.प्रशासनाने या मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांसाठी आठवडे बाजाराची नियमावली तयार करून त्यांच्या कुटूंबाची हेळसांड थांबवावी. त्यांच्यावर असणारे कर्जाचे हप्ते थकीत आहे. सध्या रडतखडत सुरू असलेला प्रपंच याची शासनाने गंभीर दखल घेत आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSatara areaसातारा परिसर