शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात विक्रेते फूटपाथवर; प्रवासी रस्त्यावर ! बसस्थानक परिसरातील स्थिती : चायनीज व्यावसायिकांकडून अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:52 IST

कऱ्हाड : कऱ्हाड शहर हे अतिक्रमणाचं शहर म्हणून सध्या सर्वत्र दिसू लागलं आहे. या शहरात इमारतींपासून ते पादचारी मार्ग, रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. याचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. मात्र, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकासमोरील पादचारी मार्गावरचे अतिक्रमण आजतागायत कुणी काढण्याचे धाडस केलेले नाही. उलट पालिकेच्या कृपेने चायनीज ...

ठळक मुद्देबसस्थानक परिसरातील स्थिती : चायनीज व्यावसायिकांकडून अतिक्रमण; पालिकेची कारवाई नावाला

कऱ्हाड : कऱ्हाड शहर हे अतिक्रमणाचं शहर म्हणून सध्या सर्वत्र दिसू लागलं आहे. या शहरात इमारतींपासून ते पादचारी मार्ग, रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. याचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. मात्र, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकासमोरील पादचारी मार्गावरचे अतिक्रमण आजतागायत कुणी काढण्याचे धाडस केलेले नाही. उलट पालिकेच्या कृपेने चायनीज विक्रेत फूटपाथवर अन् प्रवासी रस्त्यावर असलेले पाहावयास मिळत आहे.शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्त्यावरून चालण्याऐवजी पादचारी मार्गाचा चांगला वापर केला जाऊ लागला. मात्र, आता बांधण्यात आलेल्या या पादचारी मार्गाचा प्रवासी कमी आणि चायनीज विक्रेतेच जास्त फायदा घेत आहे. पालिका अन् पोलीस प्रशासनाच्या नियमांना डावलून या विक्रेत्यांनी बिनधास्तपणे आपला व्यवसाय फूटपाथवर थाटला आहे. यामागे कुणाची ‘मेहरबानी’ तर नाही ना! अशी चर्चा सध्या प्रवाशांतून केली जात आहे.शहरातील दत्त चौकापासून ते विजय दिवस चौक हा तसा पाहिला तर शंभर मीटरचा अंतर असलेला रस्ता. या रस्त्याकडेला पादचारी मार्गावर प्रवासी कमी अन् विक्रेतेच जास्त असलेले आढळून येतात. सायंकाळची सहाची वेळ झाली की, या ठिकाणी न्युडल्स, चायनीय पदार्थ यांचा घमघमाट सुटतो. उघड्यावर गॅस सिलिंडर ठेवून बिनधास्तपणे हे व्यावसायिक आपले पदार्थ करीत असतात. या ठिकाणी जर गॅस सिलिंडर लिक झाला किंवा अचानक आग लागल्यास मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्यता आहे.या विक्रेत्यांना हटविण्यासाठी पालिका तसेच पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी तसेच नागरिकांतून व्यक्त केले जात आहे. फूटपाथवर आदी खाद्यांच्या गाड्या असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांना पादचारी मार्ग असूनही रस्त्यावरून चालावे लागत आहे.पालिकेकडून कारवाईचा ‘दिखावा’कºहाड पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने नुकतीच बसस्थानकासमोर नव्याने सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पादचारी मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरत असणारे चारचाकी हातगाड्यावर पालिकेने शुक्रवारी कारवाई केली. त्यामध्ये पाच हातगाडे हटविले. मात्र, दुसऱ्या दिवशी पालिकेकडून कारवाईकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. इतर ठिकाणी असणारे हातगाडे जैसे थे असेच उभे राहिले आहेत. त्यामुळे या प्रकारावरून पालिकेकडून मात्र, तात्पुरत्या स्वरुपाचा कारवाईचा दिखावाच केला जात असल्याचे पाहावयास मिळाले.आतातर रिक्षासुद्धा....शहरातील बसस्थानकसमोरील असलेल्या फूटपाथवर वडाप व्यावसायिकांकडून रिक्षाही उभ्या केल्या जात असल्याचे प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात. वर्षभरापूर्वी तर रिक्षांना फूटपाथवर लावण्यासंबंधीचा प्रयोग पोलिसांकडूनच केला गेला होता. मात्र, तो फारसा यशस्वी झाला नाही. आता रस्त्यावर अन् फूटपाथवर अशा दोन्ही ठिकाणी रिक्षा व्यावसायिकांकडून आपली वाहने उभे केली जात आहेत.चायनीज स्टॉल जैसे थेशुक्रवारी दोन तास अतिक्रमण हटावची पालिकेने कारवाई केली. बसस्थानकाबाहेर मुख्य रस्त्यांवर मात्र, मोठ्या प्रमाणात चायनीज स्टॉल व गाडे उभे करण्यात आले होते. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने नक्की अतिक्रमण हटावची कारवाई करून नेमके काय साध्य केले? अशी चर्चा नागरिकांतून केली जात होती.सायंकाळनंतर मद्यपींच्याप्रमाणात वाढबसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात चायनीज व्यावसायिकांच्या गाड्यांचे प्रमाण असल्याने त्या ठिकाणी मांसाहार करण्यासाठी काही मद्यपीही येत असतात. रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी मद्यपानही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याची चर्चा इतर व्यावसायिकांतून केली जातेय.