शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांची ‘सटकली’; पण भुईच ‘धोपटली’!

By admin | Updated: November 5, 2014 23:42 IST

कारण-राजकारण : पंचायत समितीच्या सभेत अधिकारीच धारेवर --कऱ्हाड पंचायत समितीतून...

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  -विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर सोमवारी पंचायत समितीची मासिक सभा झाली़ वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरणारे सदस्य सभागृहात एका छत्राखाली आले खरे; पण शेवटी राजकारणात माहीर असणाऱ्या सदस्यांनी अधिकारीच राजकारण करीत असल्याचा आरोप करीत त्यांना फैलावर घेतले़ पण, त्यांनी ‘साप म्हणून भुईच धोपटल्याची’ चर्चा नंतर सर्वत्र सुरू झालीय !कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला़ तालुका कृषी विभागाचे अधिकारी आढावा देण्यासाठी उभे राहताच ‘मांगले तुमचं वागणं नाही चांगले,’ अशाच सुरात तुम्ही राजकारण करीत असल्याचा आरोप एका ‘दादा’ सदस्याने त्यांच्यावर केला़ त्याला अधिकारी उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतानाच ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसणाऱ्या आणखी काही सदस्यांना मग ‘भाऊ’ आला; मग साऱ्यांनी अधिकाऱ्यांना जणू फैलावरच घेतले़ शेवटी ‘पालीच्या देवमाणसाच्या’ शिष्टाईने विषय थांबला खरा; पण विषयावर कायमचा पडदा मात्र पडला नाही़ सभेनंतर मात्र पंचायत समिती सदस्यांच्यात याची चांगलीच चर्चा रंगली होती़ काहीनी तर ‘तालुका कृषी अधिकारी कोण्या एका पुढाऱ्याचेच ऐकून काम करतात,’ असा सूर आळविला़ काहीजण म्हणाले, ‘अधिकारी हे लोकप्रतिनिधींचे ऐकणारच! अन् त्या लोकप्रतिनिधीवर कोणाचा राग असेल, तर तो त्याच्यावर काढायला हवा़ उगाच ‘साप म्हणून भुई धोपटण्यात’ अर्थ नाही़’ ‘अधिकाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये,’ असंही काही सदस्य बैठकीदरम्यान म्हणाले. वास्तविक, कुठल्याच अधिकाऱ्याला राजकारणाशी काही देणे-घेणे असायला नकोच आहे़ तसे कोणी अधिकारी करत असल्यास त्याच्यावर पुराव्यासहित आरोप व्हायला हवेत़ म्हणजे, ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ व्हायला वेळ लागणार नाही़ निवडणुकीत व्यासपीठावरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांसारखे आरोप सभागृहात चुकीचे वाटतात़ अन् हो, निवडणुकीत सोयीचे राजकारण करण्यात माहीर असणाऱ्या राजकारण्यांना कोणी राजकारण शिकविण्याचे धाडस करेल, असेही वाटत नाही़ मात्र, याबाबत सभागृहात चांगलीच चर्चा रंगली होती. यांना कधी विचारणार जाब?पंचायत समितीच्या मासिक सभेला काही अधिकारी नेहमी दिसतात; पण बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, परिवहन कार्यालय आदी कार्यालयांचे अधिकारी गेल्या काही वर्षांत सभेकडे फिरकलेलेच दिसत नाहीत़ त्यांच्या अनुपस्थितीवर अनेकदा चर्चा झाल्या; पण गुण आलेला; मात्र दिसला नाही़ त्यामुळे सभागृहात आक्रमक होणारी ही सदस्य मंडळी त्यांना कधी अन् कुठे जाब विचारणार, हा संशोधनाचा विषय आहे़ तालुका कृषी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पंचायत समिती सदस्यांना नेहमीच देतो़ ज्या योजनांची माहिती दिली नाही म्हणून काही सदस्य तक्रार करताहेत; पण सर्वच सदस्यांना तीन महिन्यांपूर्वी योजनांचे महितीपत्रक अन् मागणी अर्जाचा नमुना दिला आहे़ त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य नाही़ - शिवप्रसाद मांगले, तालुका कृषी अधिकारी, कऱ्हाड