शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रोटोकॉल’च्या विषयावर सदस्य आक्रमक

By admin | Updated: March 5, 2016 00:05 IST

उंडाळकरांना डावलल्याचा आरोप : सुरळीत वीज पुरवठ्याबाबत सकारात्मक चर्चा --कऱ्हाड पंचायत समिती सभा

कऱ्हाड : पंचायत समिती सभागृहाच्या उद्घाटनासाठी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर वगळता तिन्ही आमदारांना बोलविण्यात आले. उंडाळकरांसह त्यांच्या गटाच्या सदस्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार उंडाळकरांना बोलविण्याचा प्रोटोकॉल का पाळण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत उंडाळकर गटाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. यावेळी उंडाळकर गटाच्या अजय शिरवाडकर व लक्ष्मण जाधव यांनी पंचायत समितीच्या नवीन सभागृहाच्या उद्घाटनाची कार्यक्रमपत्रिका तसेच निमंत्रणावरून सभापती तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. याबाबत खुलासा करताना सभापतींनी निमंत्रणपत्रिका तयार करताना प्रोटोकॉलनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्राधान्य दिले असल्याचे व जाणून बुजून कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. वीजवितरणच्या कामाबाबतही यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. सभापती पाटील म्हणाले, ‘गत आठवड्यात ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातील जुन्या वीज खांबांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीअंतर्गत कऱ्हाड तालुक्यातील खांबही दुरुस्त करण्यात येतील. ट्रान्सफॉर्मर्सची संख्याही वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकार्यक्षम ठेकेदार बदलण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. अकार्यक्षम ठेकेदारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे.’ रूपाली यादव यांनी शासन पातळीवर होत असणाऱ्या अशा निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी,’ अशी मागणी केली.गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. कऱ्हाड दक्षिणेत वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा कमी अधिक दाबाने होत असून, उपकरणे जळण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे वीज कंपनीने गावोगावची वीज मेंटेनन्सची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी सूचना सभापतींनी केली. लोकप्रतिनिधींकडे एखाद्या कामाची तक्रार केल्यास वीज कंपनीचे काही अधिकारी संबंधित ग्राहकाला बोलवून तक्रारीबाबत जाब विचारतात. याचा अर्थ ग्राहकांनी तक्रार करायचीच नाही का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर सभापतींनी आक्रमक पवित्रा घेत एखादा वीज कंपनीचा अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे ग्राहकांना दमात घेत असेल तर त्याची थेट आपल्याकडे तक्रार करण्याची सूचना केली.मसूर पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी करण्यात आली. अकाईचीवाडी धरणातून पाणीउपसा बंद केल्यामुळे परिसरातील गावांमधील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत प्रशासनाने काही तरी तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी चिंता राजश्री थोरात यांनी व्यक्त केली. यावर सभापती पाटील यांनी आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करून महिन्यातून एक-दोन वेळा तरी पाणी सोडण्यास सांगू, असे सांगितले. (प्रतिनिधी)ग्रामसेवकावर कारवाईची मागणीमुंढे येथील गैरहजर ग्रामसेवकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी अश्विनी लवटे यांनी केली. सभापतींनीही संबंधित ग्रामसेवकास पाठीशी घालू नये, असे गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले. अनिता निकम यांनी तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवकांना ड्यूटीवर वेळेत हजर राहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात, अशी मागणी केली.