शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सदस्य-अधिकाऱ्यांत ठरावावरून खडाजंगी

By admin | Updated: January 30, 2015 23:19 IST

कऱ्हाड पंचायत समिती सभा : विकासकामांवरून सदस्य आक्रमक; वीज विभागावर ताशेरे

कऱ्हाड : विकासकामांच्या मंजुरीचे ठराव सभेत करूनही ठरावाप्रमाणे कामे होत नसतील तर ठराव कशासाठी करायचे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ ठराव करूनही अधिकारी वर्षभर कामे करीत नसतील तर ठरावच करू नये, अशी भूमिका घेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते़ उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते़ या सभेदरम्यान सदस्या अनिता निकम, रूपाली यादव व ज्योती गुरव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ कृषी विभागाच्या आढाव्यावेळी सदस्य दयानंद पाटील व भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना योजनांविषयी विचारणा केली़ विभागाकडून योजना, प्रस्ताव कधी मागविण्यात येतात याची माहिती अधिकारी सदस्यांना देत नसल्याचे त्यांनी सांगितले़ अजय शिरवाडकर यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी प्रत्येक प्रभाग मिटींगला गैरहजर राहत असल्याची तक्रार केली. एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातर्फे अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. तालुक्यात उत्तरमध्ये २१४ व दक्षिणमध्ये २२३ तीव्र कुपोषित बालके असल्याची माहिती त्यांनी दिली. सभापती देवराज पाटील यांनी त्या भागात शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या़ तालुक्यात पेयजल योजनेची ६० कामे मंजूर असून त्यापैकी १० कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ त्यावर अजय शिरवाडकर व भाऊसाहेब चव्हाण यांनी गावातील हातपंप मोडकळीस आले असून काहींच्या फुटलेल्या पाईप बसविण्यात आल्या नसल्याचे सांगितले़ बांधकाम विभागाच्या आढाव्यावर भाऊसाहेब चव्हाण म्हणाले, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचकच राहिला नाही़ शासकीय विभागाकडून झालेल्या विकासकामांचे फलक लावले जात नाहीत़ त्यामुळे शासकीय कामे केल्यानंतर शासनाचे बोर्ड उभारावेत, अशा सूचना सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांविषयी संताप...पंचायत समितीच्या सभेस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची विचारणा संबंधित विभागांतील इतर अधिकाऱ्यांकडे सदस्यांनी केली़ त्यावेळी मिटींगला गेलेत असे जो-तो अधिकारी सदस्यांना सांगत होता़ ‘तुमचं हे नेहमीचं असतं. प्रत्येकवेळी अधिकारी गैरहजर राहतात. अधिकारीच हजर राहत नसतील तर विचारणा कुणाकडे करायची,’ असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी संताप व्यक्त केला.