शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाड करणाऱ्यांचा ‘मीटर डाऊन’

By admin | Updated: January 30, 2015 22:15 IST

रिक्षाचालक सरसावले : प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची ‘लक्ष्मी’ -- लोकमत इनिशिएटिव्ह

सातारा : महिला व युवतींची तसेच प्रवाशांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शहरातील रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरसावले आहेत. रात्री-अपरात्री महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक रिक्षाचालकाच्या गाडीचा नंबर लिहून ठेवला जाता आहे. काही महिन्यांपूर्वी सातारा बसस्थानकातून एका युवतीला मुंबई येथे सोडतो, असे आमिष दाखवून एका जीप चालकाने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून महिला कशा असुरक्षित आहेत, याची भीषणता मांडली होती. या दोन्ही घटनांचा विचार करून रिक्षाचालकांनी महिलांची सुरक्षितता हीच आपली ‘लक्ष्मी’ असल्याचे स्वत:ला मनोमन पटवून घेतले आहे. रात्री-अपरात्री बसस्थानकात एखादी महिला प्रवासी आल्यास ज्या रिक्षामध्ये ती महिला बसेल, त्या रिक्षाचा नंबर वहीमध्ये नोंद केला जातो. यदाकदाचित रिक्षाचालकाला वेळ झाल्यास इतर रिक्षाचालकही त्या चालकाला पाहायला जातात. त्यामुळे आता महिलांकडे पाहण्याची हिंमत कोणाची होणार नाही. (प्रतिनिधी)आम्ही पैसेही घेत नाही रात्री-अपरात्री एखादी महिला बसस्थानक परिसरात आल्यास काहीवेळेस तिच्याकडे पैसे नसतात; मात्र माणुसकीच्या भावनेतून अशा महिलांकडून पैसे कधीही घेत नाही. विशेषत: रात्री अचानक एखादा रुग्ण गंभीर आजारी असल्यास नातेवाईक घाईगडबडीत रिक्षाकडे धाव घेतात. त्यांच्याकडे पैसेही नसतात. मात्र, आम्ही त्यावेळी पैशाचा विचार करत नाही. माणुसकी महत्त्वाची आहे. विनाकारण रिक्षाचालकांविषयी गैरसमज पसरविले जातात, अशा काही रिक्षाचालकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.रस्त्यामध्ये एखाद्या महिलेची छेड काढल्याचे यापुढे दिसल्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; परंतु महिलांनीही रात्री बाहेर फिरताना शक्यतो नातेवाईक सोबत असावेत, याची काळजी घ्यावी. -संतोष माने , सदर बझार (रिक्षाचालक)