शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

हयातीतच नवीन घरात जायचंय !

By admin | Updated: June 22, 2017 13:33 IST

घरकुलाचे दीड वषार्पूर्वीच उद्घाटन : पाणी, विजेअभावी लाभार्थी वंचित

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : संपूर्ण आयुष्य झोपडीत घालवणाऱ्या... उन्हाचे चटके सोसत.. थंडीत बारदानाचं दरवाजा करत कुडकुडत बसणाऱ्या व गळक्या घरात पावसाचं थेंब-थेंब अंगावर झेलत संसाराचा गाडा हाकताना आपलंही एखादं घर असावं, अशी इच्छा बागळणाऱ्या आजीबाइंर्चं स्वप्न घरकुल योजनेतून पूर्ण झालं; पण वीज व पाणी न मिळाल्याने गेल्या दीड वषार्पासून नवीन घरात जाण्याची वाट पाहावी लागत आहे. तरी माज्या हयातीत तरी मला नवीन घरात जायचंय आहे, अशी इच्छा सदर बझार येथील झोपडपट्टीतील फुलाबाई या आजींनी बोलून दाखवली.केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर नगर येथे नवीन घरकुल उभारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या घरकुलाच्या कामाला सुरुवात झाली होती, तर दि. २४ फेब्रुवारी २०१६ रोजी या घरकुल पूर्ण होऊन याचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करून लकी ड्रॉ पद्धतीने या घरकुलाचे वाटपही लाभार्थ्यांना करण्यात आले. परंतु वीज व पाणी नसल्याने मागील दीड वषार्पासून हे घरकूल तसेच पडून आहेत.या वसाहतीतील नागरिकही गेल्या दीड वषार्पासून वीज व पाण्यासाठी पालिका व जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन देत हेलपाटे मारत आहेत. त्यांना फक्त आजपर्यंत आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. वीज कनेक्शनसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून येथे वीज देण्याचे काम सुरू झाले. तरीही महावितरण कार्यालयात मीटरच उपलब्ध नसल्याने हेही काम अर्धवट स्थितीत राहिले आहे.गेल्या चार वर्षांपूर्वी घरकुल योजनेसाठी येथील जागा मोकळी करण्यासाठी झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. एक-दोन वर्षांतच तुम्हाला घरे ताब्यात मिळतील, असे आश्वासन देऊन त्यांना कालव्याजवळ तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे येथील नागरिकांनी मोडकी-तोडकी पत्र्याची शेड टाकून दोन वर्षे काढली; मात्र या पावसात शेडमध्ये राहणे म्हणजेच धोका पत्कारावा लागणार आहे. कालव्यामुळे सापांचाही वावर वाढला असल्याने लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हणे टाकीला पाणी नाही..

वारंवार तक्रारी करून देखील दाद घेत नसल्याने नगरसेविका कुसुम गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता घरकुलाला पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत वाढीव पाणीसाठा होत नसल्याने पाणी देता येत नसल्याचे सांगितल्याचे शरद गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.

पाण्यासाठी आंदोलन करणार...

घरकुल योजना पूर्ण होऊनदेखील पाण्याअभावी घरात जाता येत नाही, वर्षभरात अनेक निवेदन देऊनही संबंधित विभाग दखल घेत नाही. यासाठी आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शरद गायकवाड, आमीन शेख, बाळासाहेब गुळवे, प्रतिभा गायकवाड, मीनाक्षी निंबाळकर, मुमताज पठाण आदींनी निर्णय घेतला आहे.