शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मायबाप सरकार....राजमा पिकवायचा का नाय? कोरेगावातील शेतकºयांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:24 IST

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे.

ठळक मुद्देदर घसरले :कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे. ‘मायबाप सरकार तुम्हीच सांगा, आम्ही राजमा पिकवायचा का नाय?’ असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून राजमा ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यात राजम्याचे भरघोस उत्पादन घेतले जाते. येथील चवदार राजम्याला देशभरातील बाजारपेठांमधून मागणी आहे. अलिकडच्या काळात कोरेगाव बरोबरच खटाव आणि माण तालुक्यांच्या काही भागातही राजम्याचे पीक घेतले जाते.

यावर्षी मान्सून थोडाफार झाल्यावर शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यानंतर दडी मारलेल्या मान्सूनने अधूनमधून थोडी फार हजेरी लावली. त्यावर आलेले पीक हातात पडण्याची वेळ आल्यावर परतीच्या पावसाने त्यावर पाणी फिरविले. त्यातूनही वाचलेले पीक बाजारात घेऊन गेल्यावर मिळत असलेल्या दराने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भिजलेला घेवडा सुकवता-सुकवता नाकीनऊ आले होते. त्यात उत्पादन खर्च निघेल एवढाही दर पदरात पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.दिल्ली, पंजाब मुख्य बाजारपेठदिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर ही या पिकांची मोठी आणि प्रमुख बाजारपेठ आहे. वाघा घेवडा ही राजम्याची खरी ओळख. गेल्या दहा वर्षांत यात बीज क्रांती होऊन ‘वरुण’ या नावाने अडीच महिन्यांत आणि अतिशय कमी पाण्यात दुप्पट उत्पन्न देणारा वाण विकसित करण्यात आला. त्यामुळे मूळचा वाघा घेवडा आता नामशेष झाल्यात जमा झाला आहे. तरीही त्याची बाजारपेठेतील मागणी कमी झालेली नाही. तिन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य शेतकºयांचे आर्थिक गणित याच घेवड्यावर अवलंबून आहे.