सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस होत आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कमाल तापमान उतरले आहे. सोमवारी साताऱ्यात ३५.०१ अंशांची नोंद झाली. दरम्यान, कमाल तापमान कमी झाल्याने उकड्याची तीव्रताही कमी झाली आहे.
जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून अवकाळी आणि वळवाचा पाऊस अनेकवेळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान अजूनही ४० अंशांच्या पुढे गेले नाही. आतापर्यंत सातारा शहराचा पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, मागील २० दिवसांत जिल्ह्यात वाळवाचा पाऊस वारंवार झाला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. परिणामी कमाल तापमान कमी होत गेले आहे. सातारा शहरात सोमवारी कमाल तापमान ३५.०१ अंश होते. जिल्ह्याच्या दुष्काळी भागातही कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत आहे. त्यामुळे उकाडा कमी जाणवत आहे.
दरम्यान, रविवारी सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडला. मात्र, सोमवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. पाऊस पडण्याची घटना कोठेही घडली नाही.
.........................................................................