शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माउलींची पालखी बरडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:51 IST

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या ...

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या मनीचि आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ याप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन बरडकडे मार्गस्थ झाला.वाटेत धुळदेव येथे परशुराम फरांदे, व्यंकटराव दडस, माणिकराव कर्णे, सुभाष शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी, भाडळी ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले.हरिनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात पालखी सोहळा न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच प्रशांत जाधव, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समितीचे सदस्या सुशीला नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, सचिन भोसले, अशोकराव पवार, डॉ. उत्तमराव शेंडे यांनी स्वागत केले.वाजेगाव येथे दुपारचा विसावा घेतला. तेथे सरपंच संगीता निंबाळकर, उपसरपंच रवींद्र भोसले, सुजित रणवरे, अमोल निंबाळकर, मोहन नाईक-निंबाळकर, शंभूराज निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, श्रीकांत निंबाळकर, लालासाहेब निंबाळकर यांनी स्वागत केले. काही काळ विश्रांती घेऊन वारकरी मुक्कामासाठी बरडकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी बरडला विसावले. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, जिल्हा परिषद सदस्य भावना सोनवलकर, नानासाहेब लंगुटे, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्वागत केले.आज सोलापूर जिल्ह्यातश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गेले चार दिवस सातारा जिल्ह्यात आहे. तो मंगळवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी येथे निरोप तर सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.