शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

‘आधुनिक’ एसटीच्या मास्तरांची शिट्टी गुल!

By admin | Updated: May 23, 2014 22:55 IST

एसटीने धरली आता आधुनिकीकरणाची कास

 साहिल शहा ल्ल कोरेगाव सामान्य जनतेचे प्रवासाचे साधन असलेल्या एसटीने आता आधुनिकीकरणाची कास धरली आहे. बसेसच्या रचनेपासून कर्मचार्‍यांच्या कामकाजापर्यंत आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. पूर्वीच्या काळी खाकी वर्दी, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, हातात पत्र्याची पेटी, काखेत तिकिटांचा फोल्डिंग ट्रे अडकवत आणि गळ्यात पैशांची चामडी पिशवी लटकविणारा कंडक्टर अर्थात मास्तर नामशेष होऊ लागला आहे. नव्याने भरती झालेले युवक कंडक्टर लाज वाटते म्हणून या गोष्टींचा वापर टाळत असून, सर्वांत महत्त्वाची अशी मास्तरच्या तोंडातील पितळी शिट्टी देखील गायब झाली आहे. काही जण केवळ हौस म्हणून शिट्टीचा वापर करत आहेत. पूर्वी चालक-वाहकाच्या डोक्यावर ‘पी-कॅप’ आणि खाकी गणवेश होता. एका हातात पत्र्याची पेटी, दुसर्‍या हातात पत्र्याचा फोल्डिंग होणारा तिकिटांचा ट्रे, काखेत तगडासह पांढरी कागदे लटकविलेले ‘व्हे बिल’, गळ्यात अडकविण्याची चामडी पिशवी आणि शर्टच्या डाव्या बाजूच्या खिशात असलेली पितळी शिट्टीदेखील त्याला ठेवावी लागत होती. नेमून दिलेल्या मार्गावर प्रवासी वाहतूक करत असताना अनेक बसस्थानकांवर बस जायची, तेव्हा प्लॅटफॉर्मला बस घेण्यासाठी कंडक्टर शिट्टीचा वापर करत असत. त्यावेळी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनच्या चित्रपटातील गाणी जवळपास शिट्टीवर वाजविण्याचा खटाटोप बरेच कंडक्टर करीत असत. सातारा, स्वारगेट, कराड, कोल्हापूरसह मुंबईतील सर्वच बसस्थानकांवर सकाळी ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत शिट्ट्यांचा आवाज घुमत असे. शिट्टी वाजविण्याचे अनेक प्रकार त्यावेळी कंडक्टरने अंगीकारले होते. आधुनिकीकरणात एसटीने कात टाकली आहे. गणवेशाचा रंग खाकी ठेवला असला तरी डोक्यावरील ‘पी-कॅप’ आणि गांधी टोपी हद्दपार झाली आहे. तिकिटांचा ट्रे आणि पर्यायी ‘व्हे बिल’ पत्र्याच्या पेटीत पडले असून, त्याची जागा इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रांनी घेतली आहे. नव्याने भरती झालेले कंडक्टर आता या जुन्या वस्तूंना विचारतदेखील नाहीत. या वस्तूंबरोबरच शिट्टीदेखील ूहद्दपार झाली आहेत. बहुतांश बसस्थानकांमध्ये फलाटांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिली असल्याने अनेक चालक-वाहक बसेस फलाटांवर लावण्याचे टाळतात. त्याऐवजी एका बाजूला बस उभी करुन प्रवासी पळविण्याचा त्यांचा फंडा असतो. बर्‍याच वेळा बस फलाटावर मागे घेत असताना कंडक्टर शिट्टीऐवजी घंटीचाच वापर करतात. त्यामुळे कधीकाळी ‘शान’ असणारी शिट्टी अडगळीत पडली आहे. शिट्टीची गरजच भासत नाही ४आधुनिकीकरणाच्या नावाखाली एसटी बसच्या रचनेत लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. दर्शनी भागातील फलकांची जागा, काचा, दोन्ही बाजूकडील खिडक्या आणि पाठीमागील काचांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी पाठीमागे केवळ संकटकालीन मार्गासाठी उपयुक्त म्हणून एकच छोटी काच लावण्यात आली होती. दोन्ही बाजूला खिडक्यांचा आकार लहान होता आणि दरवाजा पाठीमागील बाजूस होता. त्यामुळे बस फलाटाला लावत असताना चालकाला कंडक्टरच्या शिट्टीचा मोठा आधार होता. शिट्टीनुसार बस मागे येत आणि थांबत असे. आता मात्र बसेसची रचना बदलली असून, चालकाला सर्वच बाजूने व्यवस्थित दिसते आणि दारही पुढील बाजूस आणण्यात आले असल्याने आता बस पाठीमागे घेताना कंडक्टरच्या शिट्टीची गरज भासत नाही.