अथणी : संकोनट्टी (ता. अथणी) येथील जवान भरतेश तायाप्पा पडनाड (वय ३०) हे मणिपूरमध्ये गुरूवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. भरतेश हे २००५ मध्ये लष्करात दाखल झाले होते. सध्या ते मणिपूरमध्ये चंदेनहली भागात सेवा बजावत होते. गुरूवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती शुक्रवारी रात्री उशिरा गावामध्ये समजली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन मुुले असा परिवार आहे. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव संकोनट्टी येथे दाखल होईल, अशी माहिती देण्यात आली. (वार्ताहर)
संकोनट्टीचा जवान मणिपूरमध्ये शहीद
By admin | Updated: June 7, 2015 00:34 IST