शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाव वाडी गावच्या हद्दीत दुचाकीला मालट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा जागीच मृत्यू ...

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाव वाडी गावच्या हद्दीत दुचाकीला मालट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला. सारिका तानाजी मोहिते (वय ३२,रा. नागठाणे ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर वैभव विलास सकटे (वय १९, रा. अंगापूर, ता. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव सकटे हा शेंद्रे येथून आपली आत्या सारिका मोहिते हिला दुचाकीवरून (क्र.एमएच ११ डीसी ४१५२) नागठाणे येथे सोडण्यासाठी निघाला होता. भरतगाव वाडी गावच्या हद्दीत राजमार्ग हॉटेलचे पुढे ते आले. याचवेळी एका शिवशाही बसला चुकीच्या बाजूने मालट्रक चालकाने ओव्हरटेक केले. ट्रक भरधाव वेगात होता. ओव्हरटेक करतच ट्रकने पुढे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यावेळी दुचाकीवर बसलेली सारिका मोहिते ही महामार्गावर खाली पडली. त्यानंतर मालट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक वैभव हाही खाली पडल्यामुळे तो ही गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर अज्ञात मालट्रक चालकाने तेथे न थांबता मालट्रकसह तेथून पलायन केले.

या अपघाताची माहिती मिळताच हायवे बीट चारचे सचिन पोळ, पी. सी. शिंदे, बी.आर.नदाफ, बोरगाव पोलीस ठाण्याचे किरण निकम, उत्तम गायकवाड, राहुल भोये, कपिल टिकोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकास उपचारासाठी नागठाणेतील आरोग्य केंद्रात दाखल केले.

याबाबतची तक्रार वैभव सकटे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ हे करत आहेत.