शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विवाह नोंदणी झाली किचकट...

By admin | Updated: February 10, 2015 00:27 IST

साक्षीदारांसह पुरोहितांचा पुरावा : खर्चाबरोबर कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी धावपळ

प्रकाश पाटील - कोपार्डे -राज्य शासनाने सर्वच व्यवहार आॅनलाईन केल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात येणारे विविध दाखले मिळविणे सुलभ झाले आहे. यातीलच एक विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचा दाखला हवा असेल आणि त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसेल, तर ती नोंद करण्यासाठी मुंबई विवाह (वैदिक पद्धतीने संपन्न झालेले) कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करतानाच दमछाक होते.विवाह झाल्यानंतर त्याची रितसर नोंदणी ग्रामपंचायत कर्मचारी घेत असत. मात्र, सध्या संगणक युग आल्याने जेवढ्या जलद सुविधा मिळत आहेत, तेवढ्या एखाद्या नोंदीत चुका राहिल्यास अथवा नोंद देणे राहिल्यास वसूल केल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये आॅनलाईन सेवा सुरू झाल्याने २६ प्रकारचे दाखले देण्यात आले आहेत. यात जन्म, मृत्यू, दारिद्र्य रेषेखालील रहिवासी, अशा दाखल्यांचा समावेश आहे. यात नोंदणीचा दाखलाही आहे.आॅनलाईन नोंदणीची पद्धत सुरू झाल्यापासून ज्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज आहे व ज्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीकडे नाहीत त्यांना आता आॅनलाईन नोंदी घेऊन ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देता येते. मात्र, यासाठी लागणारे पुरावे गोळा करताना नाकेनऊ येत आहेत.हे प्रमाणपत्र मिळविताना महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि नोंदणी विधेयक १९९८ अन्वये सर्व पुरावे द्यावे लागतात. मुंबई विवाह कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी वर व वधू दोहोंचेही शाळा सोडल्याचे दाखले, जन्म तारीख दाखले, रेशनकार्ड अथवा रहिवासी दाखला, लग्नपत्रिका ती नसेल, तर तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्र देण्याबरोबर तीन साक्षीदार व पुरोहितांच्या वरील सर्व कागदपत्रांबरोबर १०० रुपयाचे कोर्ट फी तिकीट लावावे लागते. त्याशिवाय विलंब आकारही भरावा लागते.हे सर्व करताना संबंधित व्यक्तीच्या अक्षरश: नाकेनऊ येते. पत्नीचे माहेरकडील नाव कमी करून पतीकडील नाव लावण्यासाठी अक्षरश: कागदपत्रे व साक्षीदार गोळा करताना ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी अवस्था होते. यासाठी विवाहनोंदणी व प्रमाणपत्रासाठी किमान कागदपत्रांची अट लागू असावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.संगणकीय जगात एका प्रमाणपत्रासाठी आठ ते दहा पुरावे गोळा करून विवाहनोंदणी करताना अक्षरश: दमछाक होते. हे थांबवावे अथवा कमी कागदोपत्री पुरावे देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून सुलभ सेवा हा उद्देश सफल होईल.- सर्जेराव पाटील, कोपार्डे