कऱ्हाड : कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपशी या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सोपानराव शिंगटे (मर्ढे, ता. जि. सातारा) यांच्या सुंदर खोंडास ‘चॅम्पियन आॅफ द शो’चा बहुमान मिळाला. या प्रदर्शनामध्ये खिलार बैल, गाय, संकरित गाय, बैल, म्हशी अशा प्रकारच्या सर्व जातिवंत जनावरांचा सहभाग होता.या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये जातिवंत खिलार बैल या प्रकारामध्ये सोपानराव शिंगटे यांनी दोन दाती, चार दाती व जुळीक गट या तीन गटांमध्ये खोंड सहभागी केले होते. यामध्ये त्यांना दोन दाती गटांमध्ये द्वितीय, चार दाती गटांमध्ये प्रथम व जुळीक गटांमध्ये प्रथम असे क्रमांक मिळाले. कृषी प्रदर्शनामध्ये निवडीसाठी डॉ. जाधव, डॉ. माने, डॉ. शेख, डॉ. कादरभाई, डॉ. परिहार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)असा आहे या खोंडाचा व्यायामअडीच वर्षांचा ‘सुंदर’ अजून शेतीचे काम करू लागलेला नाही; मात्र खास व्यायामासाठी म्हणून बैलगाडीला जुंपून रोज सकाळी त्याला शिवाराला फेरी मारण्याचे काम दिले जाते. याखेरीज कृष्णेच्या पात्रात पोहण्याचा व्यायामही ‘सुंदर’ रोज करतो.
मर्ढेच्या ‘सुंदर’नं मारलं मैदान!
By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST