शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

मांढरदेवला कार खाक

By admin | Updated: January 12, 2015 01:31 IST

यात्रेनंतरही गर्दी : तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

मांढरदेव : मांढरदेव येथील श्री काळूबाईच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकाच्या इंडिका कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, यात्रेनंतरचा पहिला रविवार असल्याने सुमारे तीन लाख भाविक दर्शनासाठी मांढरगडावर दाखल झाले. कोथरूड (पुणे) येथील भाविक हुलावळे हे आपल्या इंडिका कारमधून (एमएच १२ सीटी ८६७७) मांढरदेवला येत होते. भोर-मांढरदेव घाट चढल्यानंतर अंबाड खिंडीजवळ गाडीने अचानक पेट घेतला. कोचळेवाडी चेकपोस्टपासून एक किलोमीटर अंतरावर व मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गाडीत चार व्यक्ती होत्या. गाडीतून धूर येऊ लागताच गाडीतील सर्व व्यक्ती बाहेर आल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. धुरापाठोपाठ गाडीने पेट घेतला. ही आग एवढी प्रचंड होती की संपूर्ण गाडी जळून खाक झाली. रस्त्यावरच गाडीने पेट घेतल्याने व आज दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे या रस्त्यावरील वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. दरम्यान, आज मुख्य यात्रेनंतरचा पहिला रविवार असल्याने देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे तीन लाख भाविकांनी काळूबाईचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. (वार्ताहर)