शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज आरक्षणाचा एल्गार पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातून!

By admin | Updated: July 29, 2016 23:19 IST

उद्या आयोजन : नीलेश राणेंची पहिली सभा

सातारा : मराठा समाजातील दुर्लक्षित घटकांच्या हक्कासाठी आवश्यक असलेल्या मराठा समाज आरक्षणाचा एल्गार आता पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. माजी खासदार नीलेश राणे यांची पहिली सभा रविवार, दि. ३१ रोजी सायंकाळी चार वाजता साताऱ्यातील स्वराज्य सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. काँग्रेस आघाडी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देता यावे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला होता. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अथक मेहनत घेऊन सर्वंकष अभ्यास करून मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. ती करताना अन्य समाजाला असणाऱ्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. या अहवालातील शिफारशीचा आधार घेत आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय न्यायालयात टिकावा यादृष्टीने विधी आणि न्याय विभाग तसेच अ‍ॅड. जनरल यांचाही कायदेशीर सल्ला घेण्यात आला होता. निर्णयाचा हा मसुदा प्रत्येक निकषावर टिकेल असा तयार करण्यात आला होता. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान दिल्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राज्य सरकारने त्याविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे घोषित केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर जनजागृती करून या मागणीसाठी आग्रह धरण्याच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या दौऱ्याचा शुभारंभ दि. २४ एप्रिलला रत्नागिरी येथून झाला. आता हा दौरा पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. पहिली सभा रविवार, दि. ३१ जुलै रोजी साताऱ्यात होणार आहे. यावेळी खासदार नीलेश राणे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)