शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मराठा समाजाचा मोर्चा ३ आॅक्टोबरला !

By admin | Updated: September 11, 2016 23:57 IST

बैठकीला तीन हजार बांधव : गर्दीचा विक्रम घडविण्याचा निर्धार

सातारा : कोपर्डी घटनेचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, मराठा समाजाला आरक्षण द्याव,े आदी मागण्यांसाठी एकत्र येत जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबरला ‘न भूतो न भविष्यति’ असा मराठा क्रांती मोर्चा काढण्याचा निर्धार केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न जाता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तिथे बोलावून निवेदन देण्याचेही ठरले. रविवारी साताऱ्यात झालेल्या या बैठकीला सुमारे तीन हजारांहून अधिक मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. येथील स्वराज मंगल कार्यालयात साताऱ्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यांतूनही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, आदी क्षेत्रांतील मान्यवर आले होते. बैठकीत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतानाच दि. ३ आॅक्टोबरचा साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चा हा विराट असा काढण्याचा निर्णय केला. त्याला सर्वांनीच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला. तसेच यावेळी मान्यवरांनी ‘आतापर्यंत राज्यात अनेक मराठा क्रांती मोर्चे निघाले आहेत. त्यापेक्षाही मोठा असा मोर्चा मराठ्यांच्या राजधानीत काढू या. त्यामुळे महाराष्ट्र घाबरला पाहिजे. राजकारण न करता सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊ या,’ असे आवाहनही केले. साताऱ्याचा मराठा क्रांती मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर न जाता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येईल. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावे, यासाठी विनंती करण्यात येईल. त्यानंतर निवेदन देण्यात येईल. दरम्यान, साताऱ्यात होणाऱ्या या मोर्चात कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाहीही शहरातील मान्यवरांनी दिली. (प्रतिनिधी) तालुकानिहाय नियोजन साताऱ्यातील रस्त्यांची स्थिती पाहता वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठीही नियोजन ठरविण्यात आले. सातारा शहरातील बांधवांचा मोर्चा गांधी मैदानापासून निघेल. जावळी, वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यांतील बांधव हुतात्मा स्मारक येथे जमा होतील. कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील बांधव बोगदामार्गे राजवाड्यावर येतील तर फलटण तालुक्यातील बांधव जुना आरटीओ आॅफिस येथे येतील. माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांतील बांधव थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा होतील, असेही यावेळी ठरविण्यात आले.