शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चाचे नेतृत्व छत्रपतींकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 15:19 IST

सातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्यांचे वंशज यानिमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसतील.

ठळक मुद्देउदयनराजे- संभाजीराजेंच्या खांद्यावर दिली जबाबदारीमराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीची निवड संयोजक करण गायकर यांची माहितीदोघे राजे संयुक्तिकपणे मोहिमा काढणार

सातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्यांचे वंशज यानिमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसतील.

९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत २१0 सदस्य असणार आहेत. या समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे यांच्याकडे सूत्रे राहतील, अशी माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

सकल मराठा समाजाने मुंबईवर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळाला. लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा क्रांतिदिनी थेट मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. साहजिकच सर्व जिल्ह्यांमध्ये काढलेल्या मोर्चात सहभागी झालेले लाखो मराठा बांधव एकत्रितपणे मुंबईत धडकणार असल्याने मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा समावेश करुन २१0 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांची बाजू दस्तुरखुद्द कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. उदयनराजेंच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उदयनराजेंच्या नेतृत्वाची व्याप्ती यानिमित्ताने पुढे आली. त्याला संभाजीराजेंचीही साथ मिळत आहे. आता राजकीय क्षेत्रातही हे दोघे राजे संयुक्तिकपणे मोहिमा काढताना पाहायला मिळू शकतील.