शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आज मराठा महामोर्चा

By admin | Updated: October 3, 2016 00:14 IST

पोलिस यंत्रणा सतर्क : आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा संयोजकांचा निर्धार

 सातारा : साताऱ्यात आज, सोमवारी सकल मराठा क्रांती महामोर्चा निघणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, परजिल्ह्यातील पोलिसांची कुमकही मागविण्यात आली आहे. दरम्यान, वातावरण निर्मितीसाठी रविवारी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चा निघत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महामोर्चाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने आजवरचे सर्व विक्रम मोडण्यासाठी संयोजकांनी निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने तयारी झाली असून, सातारा शहरातील चौकाचौकांमध्ये भगव्या पताका आणि महाकाय फ्लेक्स लावले आहेत. शहरात सोमवारी पहाटेपासूनच मराठा समाजबांधव महामोर्चाला येणार असल्याने त्यांना मोर्चाचा मार्ग लक्षात यावा, यासाठी पोलिसांनी रस्त्यावर ठिकठिकाणी फलक लावले आहेत व वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शाहू क्रीडा संकुलमध्ये पोलिसांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. (प्रतिनिधी) हजारो बांधव साताऱ्यात पुणे, मुंबईसह कोल्हापूरमध्ये शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेले; पण मूळचे साताऱ्याचे असलेले हजारो समाजबांधव रविवारीच साताऱ्यात दाखल झाले आहेत. साताऱ्यातील पाहुण्यांकडे ते मुक्कामी थांबले असून, शहरातील हॉटेल्स, लॉज फुल्ल झाले आहेत.