शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘मराठा आयकॉन’

By admin | Updated: September 13, 2016 00:45 IST

तरुणांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत तसेच मान्यवरांचेही ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन माहिती, नियोजन, बैठका याची माहिती देण्यात येऊ लागली आहे.

सातारा : कोपर्डी घटनेनंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चे लाखोंच्या संख्येने निघू लागले असून, साताऱ्यातील विराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता गावोगावी मराठा तरुणांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे आयकॉनही झळकू लागले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील क्रांती मोर्चा हा लाखोंच्याच संख्येने निघणार, हे यावरून स्पष्ट होत आहे. उस्मानाबाद, बीड येथील मोर्चा तर महामोर्चा ठरला. आता साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा हा विराट आणि ‘न भूतो न भविष्यति’ असा काढण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केला आहे. साताऱ्यात झालेल्या नियोजन बैठकीत मोर्चाची आचारसंहिता, रूपरेषा, तालुकानिहाय बैठका, साताऱ्यातील मोर्चावेळी एकत्र येण्यासाठीचा मार्ग याचे नियोजन झाले आहे. आता साताऱ्यातील हा मोर्चा मोठा व विराट ठरविण्यासाठी मराठा समाज बांधवांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे पाहता साताऱ्यातील नियोजन बैठकीपूर्वीच गावोगावच्या मराठा समाज बांधवांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून मोर्चासाठी जनमत तयार करण्यात येऊ लागले आहे. तरुणांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत तसेच मान्यवरांचेही ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन माहिती, नियोजन, बैठका याची माहिती देण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे गावोगावच्या मराठा समाज बांधवांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आता मोर्चाचा आयकॉन दिसून येऊ लागला आहे. (प्रतिनिधीमेढ्यात रविवारी; खंडाळ्यात लवकरच बैठक मेढा/खंडाळा : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी यासाठी मेढा येथे रविवार, दि. १८ रोजी दुपारी एक वाजता यशोदिप मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. तसेच खंडाळा येथेही नियोजन सुरू आहे. येत्या आठवड्यात खंडाळा येथे ही बैठक पार पडणार आहे.तालुक्यातील प्रत्येक गावात बैठकीसाठी मेसेज दिले जात आहेत. मोबाईल व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक यांसह सोशल मीडियावरून ‘मराठा क्रांती मोर्चाचे’ मेसेज पाठवले जात आहेत. जिल्ह्याचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी जावळी अन् खंडाळा तालुकाही अग्रेसर राहणार आहे.तरुणांचा मोठा सहभाग...साताऱ्यात निघणाऱ्या क्रांती मोर्चासाठी मराठा समाजातील तरुणाई अग्रेसर राहणार, असे दिसून येऊ लागले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून साताऱ्यातील मोर्चा विराट काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे मोर्चात तरुणांचा मोठा सहभाग राहणार आहे.