शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात मराठा बांधवांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:58 IST

सातारा : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा, फलटण, म्हसवड, महाबळेश्वर, कºहाड, ...

सातारा : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. सातारा, फलटण, म्हसवड, महाबळेश्वर, कºहाड, खंडाळासह ठिकठिकाणी पेढे व साखर वाटून जल्लोष करण्यात आला. आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी,’ अशा घोषणा दिल्या.म्हसवडमध्ये साखर वाटून जल्लोषराज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्वपक्षीय मराठा समाजाने जल्लोष करून म्हसवड येथे आनंद व्यक्त केला. मुंबई येथील राज्य अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव मांडला. त्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, रासप, शेकापसह सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला.मराठा आरक्षण एकमताने मंजूर होताच म्हसवड येथील सर्व मराठा बांधव एकत्र आले. म्हसवड बसस्थानक व प्रमुख चौकात फटाके वाजवून, साखर वाटून जल्लोषात घोषणा देऊन सर्वांनी आनंद व्यक्त केला. या निमित्ताने सर्वांनी श्री सिद्धनाथाचे दर्शन घेतले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी बाळासाहेब राजेमाने, जय राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, बाबासाहेब माने, आकाश माने, महादेव माने, डॉ. जयराज पवार, सुरेश काटकर, बापूसाहेब बाबर यांच्यासह सर्व राजकीय पक्षातील अनेक मान्यवर मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेणबत्त्या प्रज्वलित करून वाहिली श्रद्धांजली..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरील मंत्रिमंडळ समितीचा एटीआर सादर केल्यानंतर गुरुवारी कोणत्याही चर्चेविना मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शहरी भागासह ग्रामीण भागातही स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विशेषत: शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. कºहाड येथे सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले.