शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

यापुढेही अनेक दिग्गज नेते भाजपात येणार : दानवे

By admin | Updated: October 23, 2016 00:41 IST

फलटण : कदम, शिंदे अन् घोरपडे यांच्या पक्ष प्रवेशासोबत कार्यकर्ता मेळावाही उत्साहात

फलटण : भारतीय जनता पक्षात यापुढेही जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दरम्यान, भाजपा शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच कामकाज करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्षात माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम, जिल्हा परिषद शेती समिती सभापती शिवाजीराव शिंदे, मनोज घोरपडे व अन्य पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश झाल्याची घोषणा आणि कार्यकर्ता मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षपदावरून प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खा. संजय काकडे, माजी आमदार पाशा पटेल, दिलीप येळगावकर, कांताबाई नलवडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. दानवे म्हणाले, ‘आगामी काळात पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्या-त्या भागात अडवून जमिनीखालील पाणी पातळी उंचावण्याचा व त्याद्वारे शेतीला अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने केला जाणार आहे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याची पहिली पायरी म्हणून दीनदयाळ उपाध्याय आणि पंजाबराव देशमुख योजनेद्वारे आर्थिक सवलती जाहीर केल्या आहेत.सत्ता बदलानंतर किंंबहुना बदलेल्या सरकारने घेतलेला विकासाचा वेग आणि सर्वसामान्यांना होणारे लाभ लक्षात घेऊन भाजपामध्ये अनेक मोठमोठी माणसे प्रवेश करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री कदम, शिवाजीराव शिंंदे यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व असल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी स्पष्ट केले.’महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजपामुळे सामान्य माणसांचे भले होणार आहे. हा लोकांच्यात विश्वास निर्माण झाल्याने या पक्षाबद्दल सर्वच ठिकाणी आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे. जलयुक्त शिवारद्वारे ५ हजार गावांना फायदा झाला आहे. शेतीमालाला अधिक दर देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी सुखी समाधानी राहील यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिवंगत चिमणराव कदम यांनी या तालुक्यात जनसामान्यांसाठी चांगले काम केले त्यांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सह्याद्री कदम यांच्या माध्यमातून सक्षम पर्याय उभा राहू शकतो याचा विचार करून त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला असून, आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण ताकद देऊन विकासाच्या कामात अग्रेसर राहण्याची संधी दिली जाणार आहे. भविष्यात भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन कामाची संधी द्या. पंतप्रधानांचे हात बळकट करा सर्वांचे हित निश्चित होईल.’ अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सह्याद्री कदम यांच्या प्रवेशाने भाजपात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या पाठीशी राहा.श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने दिवंगत चिमणराव कदम यांनी फलटण तालुक्यात आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला चालना दिली परंतु अलीाकडे शहरात नागरी सुविधा योग्यप्रकारे मिळत नाहीत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे नमूद करीत जिल्हा परिषदेच्या सर्व सात गटांचा आढावा घेत तेथेही अनेक समस्या असल्याचे निदर्शनास आणून दिले.कार्यक्रमास भाजपा राज्य चिटणीस अतुल भोसले, रवी अनासपुरे, अ‍ॅड. भरत पाटील, लोणंदचे उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, शिवाजीराव शिंदे, विक्रम पावसकर, महेश शिंदे, मनोज घोरपडे उपस्थित होते. अशोक भोसले यांनी प्रास्ताविक केले. विजय कढणे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)