शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

अपघात पाहताना अनेक अपघात

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

कऱ्हाडनजीक घटना : सहा वाहने एकमेकावर आदळली; जीप, बस, टँकर, ट्रकसह दोन कारचे नुकसान

कऱ्हाड : अपघात झाल्यानंतर तो कसा झाला, त्यामध्ये कोण-कोण जखमी झाले, नक्की कशाचा अपघात झाला, हे पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते. पण मदत कोणीच करत नाही़ अपघात पाहण्याच्या उत्सुकतेपोटी सहा वाहनांचा अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी कऱ्हाडनजीक पाचवड फाटा येथे घडली़ घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या लक्झरी बसची आणि ट्रकची पाचवड फाटा येथे रविवारी पहाटे धडक झाली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसानही झाले. अपघातामुळे ट्रक व बस महामार्गाकडेलाच थांबली होती. त्याच वेळी कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो जीपचालकाचा अपघातग्रस्त ट्रक व बस पाहण्याच्या प्रयत्नात जीपवरील ताबा सुटला. त्यामुळे जीप महामार्गावर उलटून जवळून निघालेल्या पांढऱ्या स्विफ्ट कारला धडकली. या धडकेत कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली़, तर कारचे प्रचंड नुकसान झाले. एकापाठोपाठ घडलेल्या या तीन अपघातांमुळे महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबली. चालकांनी अचानक ब्रेक दाबल्यामुळे पूर्वीच्या अपघातस्थळापासून काही अंतरावर एकामागे एक वाहने थांबली. दरम्यान, त्याच वेळी ‘काय झालं’ हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी लाल रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणाऱ्या टँकरची स्विफ्टला जोरात धडक बसली़ या धडकेमध्ये स्विफ्ट कार दोन फुटापर्यंत उचलून रस्त्याकडेला जाऊन उपमार्गावर उलटली. त्यामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)पोलिसांत नोंदच नाहीअपघात गंभीर असेल तर त्याची नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद होते. तसेच त्याचा पोलिसांकडूनही तपासही केला जातो. पाचवड फाटा हे ठिकाण कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, रविवारी पाच वाहनांचा अपघात होऊनही त्याची कसलीच नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नाही. अपघाताबाबत कुणाचीच कुणाविरूद्ध तक्रारही नाही, हे विशेष!