शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मनोमिलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन याच कृष्णा काठावर रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथे कृष्णा ...

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन याच कृष्णा काठावर रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. ते राज्याच्या मंत्रिमंडळात गेल्यावर या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांचे लहान बंधू जयवंतराव भोसले यांनी सांभाळली. भोसले या कारखान्याचे सलग तीस वर्षे अध्यक्ष राहिले.

अवघा कृष्णाकाठ ''यशवंत हो जयवंत हो'' हे गीत गुणगुणत असताना या बंधू प्रेमाला दृष्ट लागली. अन दोन सख्ख्या भावात सत्तासंघर्ष सुरू झाला. सन १९८९ साली यशवंतराव मोहिते यांच्या रयत पॅनलने जयवंतराव भोसले यांच्या सहकार पॅनलचा पराभव करीत पहिले ऐतिहासिक सत्तांतर केले. हा दोन भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांच्या वारसदारांनीही हा संघर्ष तसाच पुढे कायम ठेवलेला दिसतोय.

पहिल्या सत्तांतरानंतर यशवंतराव मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते यांनी सलग दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर डॉ. पतंगराव कदम व मदनराव मोहिते यांनी गुरुदक्षिणा म्हणून यशवंतराव मोहिते यांचे पुत्र डॉ. इंद्रजित मोहिते यांना कारखान्याचे अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त करून दिली. या प्रत्येक निवडणुकीत मोहिते भोसले संघर्ष पाहायला मिळाला. पण इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुकीत सत्ताबदल झाला. भोसले गट सत्तेवर आला. डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले.

दरम्यानच्या काळात सन २००७ च्या सुमारास भारती विद्यापीठाचे प्रमुख डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते भोसले ही दोन कुटुंबे एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला. कृष्णाकाठाने पहिले ''मनोमिलन'' पाहिले. त्यानंतर २००९-१०साली कारखान्याची निवडणूक लागली. हे मनोमिलन निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा नवख्या असणाऱ्या अविनाश मोहित्यांनी संस्थापक पॅनल रिंगणात उतरविले अन् कोणाच्या ध्यानीमनी नसताना सत्तांतराचा ''नारळ'' फुटला. तेव्हा मोहिते भोसलेंचे हे मनोमिलन सभासदांच्या पचनी पडलेले नाही हे सार्‍यांनीच अनुभवले. त्यानंतर हे मनोमिलन फारकाळ टिकले नाही ही बाब वेगळीच !

आज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाची ही चर्चा आहे. विशेष म्हणजे कदम परिवारातीलच सदस्य, विद्यमान सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याबाबत सारख्या बैठका सुरू आहेत. मनोमिलनाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. ''राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो'' हे अगदी खरे आहे. त्यामुळे जर हे मनोमिलन झाले तर नवल वाटायला नको. पण हे नवे मोहिते यांचे मनोमिलन सभासदांच्या किती व कसे पचनी पडेल हे सांगणे अवघडच आहे. तूर्तास या नव्या मनोमिलनासाठी शुभेच्छा द्यायला हरकत नाही.

प्रमोद सुकरे; कराड