शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या स्पर्धेला मनोमिलनाची किनार

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

प्राथमिक शिक्षक बँक : पाटील गटाकडून कदम; थोरात यांच्याकडून राजेंद्र घोरपडे, बळवंत पाटील यांची नावे चर्चेत

दत्तात्रय पवार -कुडाळ -माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघ आणि संभाजीराव थोरात प्रणित संघ यांच्यात शिक्षक बँक निवडणुकीत समितीला रोखण्यासाठी ऐतिहासिक मनोमिलन झाले. तसेच सत्ता मिळविण्यासाठी शिवाजीराव पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळे पाटील गट प्रथम अध्यक्षपदाचा दावा करीत आहे. संचालकांमधून अध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे मनोमिलन झालेल्या संघातून शिक्षक बँकेचा अध्यक्ष कोण होणार ? याची चर्चा रंगू लागली आहे. पाटील गटाकडून तुकाराम कदम, तर थोरात गटातून राजेंद्र घोरपडे, बळवंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षकांच्या आग्रहास्तव शिवाजीराव पाटील यांनी थोरात गटाशी मनोमिलन करीत नऊ जागा लढविल्या. तर थोरात गटाने बारा जागा लढविल्या. निवडणुकीत दोन्ही संघांनी १७ जागांवर विजय मिळविला. थोरात गटातील काही मंडळींकडून निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी पाटील यांनी शिंगणापूर येथे शपथ घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला होता. तरीदेखील कऱ्हाड-पाटण मतदारसंघातील प्रदीप घाडगे यांचा संघातीलच मंडळींनी पराभव केला. ही गोष्ट शिवाजीराव पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. पाटील यांच्या रणनितीमुळे बँकेत संभाजीराव थोरात यांची सत्ता आली हे देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळेच पाटील हे अध्यक्षपदावर ठाम आहेत. मनोमिलनानुसार प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अडीच वर्षे अध्यक्षपद पाटील गटाकडे तर अडीच वर्षे संभाजीराव थोरात गटाकडे राहील असा फॉर्म्युला अवलंबला जाईल असे शिवाजीराव पाटील यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यानुसार फलटण तालुक्यातील तरडगाव गटातून विजयी झालेले व संघाचे राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम यांचे नाव पाटील गटाकडून आघाडीवर आहे. कदम हेच या स्पर्धेत सध्यातरी असल्याचे दिसून येत आहे. संभाजीराव थोरात गटातून दोन प्रवाह समोर येत आहेत. त्यापैकी एक गट हा राजेंद्र घोरपडे यांच्यासाठी तर दुसरा गट हा बळवंत पाटील यांच्यासाठी आग्रही आहे. त्यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक अध्यक्षपादाची निवडणूक पुढील महिन्यात दि. ५ जुलैला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर शिक्षक संघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच गरम झालेले पाहायला मिळत आहे. यावेळी प्रथमच संचालकांमधून अध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे संचालकांचा भाव वाढलेला दिसून येत आहे. अध्यक्षपदी कोण बाजी मारणार याकडेच जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. कदम, घोरपडेंची प्रतिष्ठा गत निवडणुकीत राजेंद्र घोरपडे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र पराभवामुळे त्यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न मागे पडले. त्यामुळे त्यांची अध्यक्ष होण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. तर पाटील गटाचे तुकाराम कदम हे देखील मागील निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यामुळे यावेळी राजेंद्र घोरपडे, तुकाराम कदम यांची अध्यक्षपदासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बँकेत संघाची एकजूट राहावी...मनोमिलन सत्तेसाठी झाले आणि बँकेत संघाने सत्ताही मिळविली. परंतु जिल्हा शिक्षक संघात आपलाच शब्दप्रमाण मानला जावा अशा मंडळींची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यातून अध्यक्षपदासाठी छुप्या पद्धतीने लॉबिंग सुरू आहे. अध्यक्षपदासाठी कसलाही घोडेबाजार होऊ नये, बँकेत संघाची एकजूट राहावी तसेच मनोमिलन कायम टिकविण्यासाठी संघाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील यांनीच लक्ष घालून संघ एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.