शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंबाला गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:28 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वरसह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. या गारपिटीचा स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे ...

महाबळेश्वर : महाबळेश्वरसह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. या गारपिटीचा स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. रोपे कुजण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.उन्हाचा कडाका वाढत असताना शनिवारी सायंकाळी महाबळेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गारांसह झालेल्या या पावसाचा पर्यटकांसह नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. परंतु स्ट्रॉबेरी पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.भिलार, पाचगणी, मुळेश्वर, माचूतर, लिंगमळा, मेटगुताड, अवकाळी, मेटतळे, वाडा, प्रतापगड या भागात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लावगड केली जाते.सध्या स्ट्रॉबेरीचा मुख्य हंगामही सुरू झाला आहे. शेतकºयांना सुगीचे दिवस आले असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून राहिल्याने स्ट्रॉबेरीचे मळे जलमय झाले होते. गारपिटीने स्ट्रॉबेरीच्या फळाची नासधूस झाली. पाण्यामुळे रोपे कुजण्याचा धोका निर्माण झाला असून, शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्ट्रॉबेरीसह तुतीलाही या पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.उत्पादन घटण्याची चिन्हेस्ट्रॉबेरी पिकाला थंड वातावरण पोषक असते. परंतु यंदा डिसेंबर व जानेवारी महिन्यात अनेकदा दवबिंदू गोठल्याने याचा स्ट्रॉबेरीला फटका बसला. अधिक थंडीमुळे पिके जळाल्याचे शेतकºयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शनिवारी झालेल्या पावसाने फळांमध्ये माती शिरल्याने हातातोंडाशी आलेली फळेही वाया गेली आहेत. रोपेही उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे यंदा स्ट्रॉबेरीचे उत्पादन घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.