शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सभेवर जनशक्तीचा ‘बहिष्कार’

By admin | Updated: February 25, 2015 00:01 IST

कऱ्हाड पालिका सभा : सभेतील सर्व विषय ‘एक’मतांनी मंजुर

कऱ्हाड : लोकशाही आघाडी आपल्या बहुमताच्या जोरावर पालिकेचे वार्षिक कामांचे टेंडर मंजूर करून जुन्या ठेकेदारांनाच काम देत आहे. याला आमचा विरोध असल्याचे सांगत सभेवर जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी मंगळवारी बहिष्कार टाकला. वार्षिक टेंडर मंजुरीसाठी कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात मंगळवारी पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळूंखे होत्यासभा सुरू होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर जनशक्ती आघाडीच्यावतीने सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांना वार्षिक कामांचे टेंडरचे विषय ‘एक’मतांनी मंजूर करावे लागले. वार्षिक टेंडर मंजुरीसाठी घेण्यात आलेल्या सभेस लोकशाही आघाडीचे १६ नगरसेवक उपस्थित होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकूण ४५ विषय मंजूरीसाठी सभागृहात मांडण्यात आले. या विषयांना नगराध्यक्षांच्या संमतीने एकमतांनी मंजुरी देण्यात आली. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सभेच्या सुरूवातीस जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपाविषयी खुलासा केला. यावेळी सुभाष पाटील म्हणाले, जनशक्तीने केलेल्या मागणीनुसार वार्षिक टेंडर गेली तीन वर्षे ठराविक ठेकेदारांनाच दिले जात आहे. ते नवीन ठेकेदारांना दिले जात नाही. पालिकेत बहूमताच्या जोरावर जुन्या ठेकेदारांना वारंवार टेंडर दिले आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र, खरी परिस्थिती वेगळीच आहे. स्वत:चे नाक कापून अपशकुन करून घेण्याची प्रवृत्ती विरोधकांमध्ये आहे. या कारणांमुळेच विरोधकांनी आजच्या सभेला अनुपस्थिती लावली. विरोधकांनी समोरासमोर येवून सभागृहात आरोप करावा. त्यावेळी आरोपाला सडेतोड उत्तर देण्याची वृत्ती आमच्यात आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी विरोधकांकडून असा प्रकार केला जात आहे. सभात्याग हे हत्यार अतिशय भयंकर असून बैठक पूर्ण होण्यापूर्वीच सभात्याग करणे चुकीचे असल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले.नगरसेवक जयवंत पाटील यांनी पालिकेतर्फे देण्यात आलेल्या व येणाऱ्या वार्षिक कामांच्या टेंडरविषयी मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहात खुलासा करावा अशी मागणी केली असता पालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या कामांच्या टेंडर विषय सत्यता पडताळणी के ली जाईल अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)जनशक्तीचा लोकशाहीकडूून निषेधजनशक्ती आघाडीने बालिशपणाने आरोप करत सभात्याग केला. या प्रकाराबाबत लोकशाहीकडून जाहिरपणे निषेध नोंदवत येत असल्याचे लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील यांनी सभागृहात सांगितले.