शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकशाही’विरोधात ‘जनशक्ती’ एकवटली!

By admin | Updated: October 30, 2016 23:24 IST

कऱ्हाड पालिका निवडणूक : भाजप, सेना, एमआयएमचे पक्षीय झेंडे; उंडाळकर आघाडीची भाजपशी हातमिळवणी

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड कऱ्हाड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी ‘लोकशाही’ आघाडीच्या विरोधात गत निवडणुकीत विखुरलेली ‘जनशक्ती’ आघाडी पुन्हा एकवटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘जनशक्ती’ने सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत; पण राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत, हे विशेष. भाजप, शिवसेना, एमआयएम यांनी पक्षांचे झेंडे खांद्यावर घेतले असले तरी त्यांनाही सर्व ठिकाणी उमेदवार देणे शक्य झालेले नाही. कऱ्हाड पालिकेची निवडणूक होत आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कऱ्हाडच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. गत निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा सांभाळत असतानाही कऱ्हाडची सत्ता त्यांच्या समर्थकांना मिळवता आली नव्हती. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत याच कऱ्हाडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर भरघोस प्रेम व्यक्त केले. त्याचाच परिणाम म्हणून यंदा प्रथमच पृथ्वीराजबाबांनी कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत स्वत: लक्ष घातले असून, कऱ्हाडकर काय कौल देणार, हे पाहावे लागेल. कऱ्हाड पालिकेत सलग चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविणाऱ्या दिवंगत पी. डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील सांभाळत आहेत. पी. डी. पाटील यांच्या पश्चातही त्यांच्या वारसदारांनी पालिकेची सत्ता अनेकदा आपल्या ताब्यात ठेवली आहे. पण यंदा त्यांना सर्व प्रभागात उमेदवार का मिळाले नाहीत, याबाबत उलट सुलट चर्चा आहे. त्यांना २२ जागांवर अधिकृत उमेदवार देता आले आहेत. दोन प्रभागात त्यांना उमेदवारच नाहीत. तर तीन प्रभागात एकच उमेदवार देता आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘लोकशाही’चा कस लागणार, हे निश्चित. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या निवडणुकीत पक्षीय झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला. पण नगराध्यक्षपद व इतर उमेदवार मिळून १६ ठिकाणी त्यांना उमेदवार देणं शक्य झाले आहे. मात्र, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीने भाजपशी हातमिळवणी केली असून त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न देता ११ ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तरीही त्यांचे सर्व ठिकाणी उमेदवार दिसत नाहीत. शिवसेनेने नगराध्यक्षपदासह दहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. एमआयएमनेही नगराध्यक्ष पदासह दहा ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. तर मानवाधिकार पार्टीने घोषणा करूनही एकही अर्ज भरलेला नाही. बुधवारी, दि. २ रोजी छाननी होणार आहे. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष रिंगणाबाहेर..! पालिकेत सध्या लोकशाही व यशवंत विकास आघाडीची सत्ता आहे.नगराध्यक्षा संगीता देसाई व उपनगराध्यक्ष म्हणून सुभाष पाटील काम पाहत आहेत. मात्र, सध्या सुरू असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत ते दोघेही रिंगणाबाहेर आहेत. त्याची चर्चा सुरू आहे. जनशक्ती विकास आघाडी, नगराध्यक्षपदासाठी - अ‍ॅड. वंदना दत्तात्रय कोरडे प्रभाग क्रमांक १ : जयश्री साने, अनिल घराळ, प्रभाग क्रमांक २ : जावेद शेख, प्रियांका यादव, प्रभाग क्रमांक ३ : गजेंद्र कांबळे, अरुणा पाटील, प्रभाग क्रमांक ४ : फिरदोश मुल्ला, अशोक, यशवंत पाटील, प्रभाग क्रमांक ५ : अस्मा खैरतखाण, सचिन गरूड, प्रभाग क्रमांक ६ : विजय वाटेगावकर, शारदा जाधव, प्रभाग क्रमांक, ७ : मिनाज पटवेकर, हणमंत पवार, प्रभाग क्रमांक ८: माया भोसले, जयवंत पाटील, प्रभाग क्रमांक ९ : दीपाली मुळे, सदाशिव यादव, प्रभाग क्रमांक १० : आरती मोहिते, राजेंद्र यादव, प्रभाग क्रमांक ११ : स्मिता हुलवान, सुनील शिंदे, प्रभाग क्रमांक १२ : शाबिरा मुलानी, पद्मिणी शिंदे, प्रभाग क्रमांक १३ : महेश कांबळे, रत्ना शेवाळे, प्रभाग क्रमांक १४ : अमिर हुसेन मुल्ला, सुप्रिया खराडे, कल्पना जाधव. भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षपदासाठी - रोहिणी उमेश शिंदे. प्रभाग, क्रमांक १ : समीर करमरकर, अनघा कुलकर्णी, प्रभाग क्रमांक २ : रमेश मोहिते, विनायक पावसकर, प्रभाग क्रमांक ४ : दीपक पाटील, शीतल कुंभार, प्रभाग क्रमांक ५ : विद्या पावसकर, सुहास जगताप, प्रभाग क्रमांक ६ : विक्रम पावसकर, शीतल निकम, प्रभाग क्रमांक, १३ : राहुल भिसे, गजाला सय्यद, प्रभाग क्रमांक, १४ : अजय पावसकर, राजश्री कारंडे, नम्रता कदम. लोकशाही आघाडी नगराध्यक्षपदासाठी - लीना सिद्धार्थ थोरवडे प्रभाग क्रमांक १ : अनिता पवार, सौरभ पाटील, प्रभाग क्रमांक २ : महंमद चाँद बागबान, अरुणा जाधव, प्रभाग क्रमांक ३ : राजेंद्र कांबळे, सारिका पाटील, प्रभाग क्रमांक ४ : आशा पाटसकर, जयवंत पाटील, प्रभाग क्रमांक ५ : शैलजा फल्ले, अमृत देशपांडे, प्रभाग क्रमांक ७ : हसिना वाईकर, प्रताप साळुंखे, प्रभाग क्रमांक ८: सागर बर्गे, प्रभाग क्रमांक ११ : राकेश शहा, प्रभाग क्रमांक १२ : वैभव हिंगमीर, पल्लवी पवार, प्रभाग क्रमांक १३ : जयप्रकाश रसाळ, रजिया आंबेकरी, प्रभाग क्रमांक १४ : मोहसीन आंबेकरी, मंदा खराडे, सुनंदा शिंदे. भाजपमध्येही धुसफूस... भारतीय जनता पक्षाने पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला खरा; पण त्यांच्यातही धुसफूस पाहायला मिळाली. त्यामुळेच भाजपचे कार्यकर्ते डॉ. गिरीश देशपांडे यांनी ऐनवेळी शिवसेनेचा एबी फॉर्म घेतला. प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांच्या मातोश्रींनी लोकशाही आघाडीतून, डॉ. अतुल भोसले समर्थक विद्यमान नगरसेवक महादेव पवार यांच्या पत्नी सारिका पवार यांनी कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीतून अर्ज दाखल केला.