शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त गावसाठी व्यवस्थापन समितीने प्रभावी कार्यप्रणाली राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ...

पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने अधिक प्रभावीपणे कोरोनामुक्त गाव अभियान राबवावे,’ असे आवाहन महाबळेश्वरचे नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांनी केले.

महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आंब्रळ गावाला तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदारांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, तलाठी नीलेश गीते, ग्रामसेवक वैभव काळे, आरोग्य सेविका, आशा प्रमिला आंब्राळे, सरिता आंब्राळे, पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे, मुख्याध्यापिका मोरे, ग्रामपंचायत सदस्य विकास जंगम, भानुदास बिरामने, सारिका आंब्राळे, सरिता आंब्राळे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र आंब्राळे, दिलीप आंब्राळे, संदीप आंब्राळे उपस्थित होते.

तिडके म्हणाले, ‘कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रिय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे या पंचसूत्रीवर आधारित असलेली ‘माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने आंब्रळ गावात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही.’

तौक्ते चक्रीवादळाने लोकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी नायब तहसीलदार यांनी जागेवर केली. तिडके यांनी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सरपंच माधुरी आंब्राळे यांनी गावातील तीस कुटुंबांना रेशन मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या पाहून घेऊ, असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिले.