शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

माण-खटाव विधानसभा : महायुतीच्या उमेदवारांकडे अनेकांच्या नजरा

By admin | Updated: September 1, 2014 00:04 IST

चेहरे समोर..चिन्ह अंधारात !

दुष्काळी माण व खटाव तालुक्यांच्या निवडणुका आजवर पाणीप्रश्नांवर लढविल्या गेल्या व जिंकल्या. दुष्काळी जनतेला निवडणुकीत पाणीप्रश्न आपणच सोडविणार, अशी आश्वासने देऊन निवडणुकीत पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करून जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकायची. निवडणुका झाल्या की पुढील निवडणुकांपर्यंत पाणीप्रश्नाचा मुद्दा आडगळीत टाकायचा हा आजवरचा इतिहास. प्रत्यक्षात निवडणुकीत दिलेला पाणीप्रश्न सोडविण्याचा शब्द विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी उरमोडी योजनेचे पाणी माणच्या अंगणी आणले. नुकताच किरकसाल येथे मुख्यमंत्र्यांनी उरमोडीच्या पाण्याचे जलपूजन केले. गोरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात १४७५ कोटींची विविध विकासकामे मतदारसंघात केल्याचे सांगितले जात आहे.माजी आमदार सदाशिवराव पोळ यांनी आजवर आपल्या ४५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत तालुक्यात केलेली विकासकामे सर्वसामान्य जनतेत मिसळून जनसामान्यावर त्यांची असलेली पक्कड, शांत, संयमी नेतृत्व ‘अब की बार तात्या आमदार’ हा नारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देऊन विधानसभा कुठल्याही परिस्थितीत जिंकायची, यासाठी तात्यांचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून जोमाने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणुकीत वापरावी लागणारी सर्व आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक रणजितसिंह देशमुख यांनी खटाव व माण तालुक्यांत औद्योगिक क्रांतीस सुरुवात करून पिंगळी येथे सूतगिरणीचे नुकतेच उद्घाटन केले. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला तालुक्यातच काम मिळाल्याने त्यांना प्रत्येक गावात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे युवकांचा ओढा वाढला आहे.आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, धनगर समाजाचा मेळावा, बेरोजगारीसाठी नोकरी मेळावा घेऊन जनसंपर्क वाढवला आहे. हरणाई सूतगिरणीच्या मशिनरी पूजन माण तालुक्यातील प्रत्येक गावात केल्याने व प्रत्यक्षात सूतगिरणी सुरू झाल्याने त्यांच्याकडे आश्वासक नजरेने माणीच जनता पाहात आहे.जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी माण व खटाव तालुक्यांत मेळावे, बैठका, भूमिपूजन, उद्घाटने असे कार्यक्रम घेऊन जनसंपर्क वाढविला असून, आजवर १५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत केलेली कामे, शालेय विद्यार्थ्यांना संगणक वाटप, कृषी प्रदर्शन घेऊन शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती करून दिली. त्यांनी केलेली विकासकामे यापुढे तालुक्यासाठी काय करणार? ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते प्रयत्नशील आहेत.पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी माण-खटाव तालुक्यातील युवक वर्ग संघटित केला आहे. त्यांनी आंधळी गणात केलेली स्वखर्चाने विकासकामे त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीत जनतेसाठी पिण्यासाठी पाण्याची टँकरची सोय, रुग्णांसाठी रुग्णवाहिका, पिकअप शेड दुरुस्ती, स्वागत कमानी आदी कामे आंधळी गणात केली. त्यांना सातारा जिल्ह्यात आंधळी, गण जसा रोल मॉडेल केला तसा माण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनवायचा आहे. सध्या त्यांची पत्नी सोनल गोरे व बहीण सुरेखा पखाले यांनी भावनिक साद घालत माण व खटाव तालुक्यांतील महिला संघटित करून हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम घेऊन हजारो महिलांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.शिवसेनेने मतदारसंघ आमचाच असल्याने या मतदारसंघातून धनाजी सावंत निवडणूक लढविणार असल्याने त्यांनी नुकताच मेळावा घेऊन शिवसैनिक चार्ज करण्यात यशस्वी झाले आहे. युती शासनाच्या काळात माण व खटावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उरमोडी धरणाची निर्मिती करण्यात आली. दुष्काळी प्रश्न शिवसेनाच सोडवू शकते, असा त्यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)लढत बहुरंगीच होणारमाण विधानसभा मतदारसंघाचे अंतिम चित्र स्पष्ट झाले नसलेतरी येथील सत्तासंघर्ष मात्र अगदी शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांतच आघाडी आणि महायुतीचे चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर खऱ्याअर्थाने रंगत वाढणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोडली तर महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याचेही निश्चित नाही.